इडा पीडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे असे दरवर्षीच दिवाळी दसऱ्याला आमची माय माऊली आम्हाला औक्षण करताना म्हणत असते. आमच्या शुद्रातिशुद्रांच्या शेकडो हजारो पिढ्या बळीच्या राज्याची आस लावून खपल्या, मातीत गेल्या, मात्र अजूनही म्हणजे जवळपास चार हजार वर्षापासून आमच्या माय मावल्यांना अपेक्षित असे