जालना - मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात नेत्यांना गावबंदी करणारे ठराव अनेक ग्रामपंचायतींनी मंजूर केले होते तसेच गावोवागी गावबंदीचे फलक आजही लावलेले आहेत; परंतु ज्या जालना जिल्ह्यातून मराठा आरक्षण आंदोलनास दिशा मिळाली, आता तिथूनच या आंदोलनास आव्हान देण्याची सुरुवात झाली असून जिल्ह्यातील कासारवाडी (ता. अंबड) येथे ओबीसी समाजाच्या बतीने सर्वपक्षीय नेत्यांचे स्वागत करणारे बॅनर लावून मराठा आंदोलकांनी घोषित केलेली गावबंदीला आव्हान देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी गावबंदीचे बॅनर लावलेले आहे, त्याच्या बाजूलाच सर्वपक्षीय नेत्यांचे स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले असून या बॅनरवर सर्व जातीय महापुरुषांसह मंत्री छगन भुजबळ यांचे चित्र मोठ्या आकारात लावण्यात आलेले आहे. हे बॅनर म्हणजे आरक्षणाच्या संदर्भात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचे प्रतीक असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, गावबंदीच्या बॅनरवरुन भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहागीर गावात दोन गटात वाद होऊन तुंबळ हाणामारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनीही नेत्यांना करण्यात आलेल्या गावबंदीमध्ये शिथिलता दिली असून राजकीय नेत्यांना २४ डिसेंबरपर्यंत गावांमध्ये येऊ द्या; परंतु त्यांचे स्वागत, पाहुणचार करु नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission