- अभिजित हेगशेट्ये
पतितपावन मंदिर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वखर्चाने बांधले आणि तेथे ते त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत सर्व जातीच्या लोकांना सहभोजनाचा खर्च करत राहीले. त्यातील संकल्पना वि. द. सावरकारांची होती. मात्र इतिहासाची नोंद करतांना आणि तो पुढे नेतांना पतितपावन मंदिराच्या उभारणीचे सारे श्रेय सावरकारांना देण्याचा प्रयत्न होतो. आणि जाणिवपूर्वक दानशूर भागोजीशेठ कीर यांचे नाव डावलले जाते, हे वारंवार घडत आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना हे मंदिर सावरकर यांनीच बांधले असा इतिहास सांगितला जातो. मध्यंतरी भाजप नेत्या श्रीमती चित्रा वाघ यांनी पतितपावन मंदिराला भेट दिली, तेथून रत्नागिरी कारागृहातील सावरकरांच्या कोठडीला भेट दिली आणि मुंबईला गेल्यानंतर पतितपावन मंदिर सावरकर यांनी बांधल्याचे मुंबईत जाहिरपणे सांगितले, यावर भागोजीशेठ कीर यांच्या चाहत्यांनी जोरदार नाराजीचा आवाज उठविला. अखेर त्यांना आपले शब्द मागे यावे लागले. आज पाठ्यपुस्तकातील चुकीचा उल्लेख तेच पुन्हा जाणीवपूर्वक करत आहे का ? अशी शंका उत्पन्न होत आहे. सतत खोटा इतिहास सांगितला की काही वर्षांनी तोच खरा म्हणून समजला जातो. त्याचाच प्रयोग दानशूर भागोजीशेठ कीरांच्या पतितपावन मंदिर बांधणीच्या इतिहासाबाबत होत आहे हे फार गंभीर आहे.
ब्रिटीश राजवटीत विनायक दामोदर सावरकर अंदमान येथील काळ्या पाण्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेवरून १९२४ साली रत्नागिरी आले. ब्रिटीशांनी त्यांना रत्नागिरी येथे काही अटीपर नजरकैदेत ठेवले होते. या काळातील सावरकरांचे पतीतप वन मंदिरातील दलीत समाजा सोबत सहभोजनाचे कार्य सान्या देशात गौरवीले गेले. मात्र हे पतितपावन मंदिर वि. दा. सावरकर यांनी उभारले असा धादांत खोटा इतिहास महाराष्ट्र शासनाने शालेय पुस्तकातील अभ्यासक्रमात नोंदल्याने एक गहजब उडाला आहे. रत्नागिरीचे दानशुर व्यक्तीमत्व भागोजी शेठ कीर यांनी सावरकरांच्या विनवणीवरून स्वतःच्या खर्चाने उभारलेले पतिपावन मंदीर आता थेट भागोजीरोठ करांचे नाव टाकून ते सावरकरांच्या नावे करण्याचा आणि इतिहासाची नोंदय बदलण्याचा होणाच्या या प्रयत्नाबद्दल कीर परिवार, समस्त भंडारी समाज नाराज आहे. ब्रिटीश राजवटीत विनायक दामोदर सावरकर अंदमान येथील काळ्या पाण्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेवरून १९२४ साली रत्नागिरी आले. ब्रिटीशांनी त्यांना रत्नागिरी येथे काही अटीपर नजरकैदेत ठेवले होते. या काळातील सावरकरांचे पतीतप वन मंदिरातील दलीत समाजा सोबत सहभोजनाचे कार्य सान्या देशात गौरवीले गेले. मात्र हे पतितपावन मंदिर वि. दा. सावरकर यांनी उभारले असा धादांत खोटा इतिहास महाराष्ट्र शासनाने शालेय पुस्तकातील अभ्यासक्रमात नोंदल्याने एक गहजब उडाला आहे. रत्नागिरीचे दानशुर व्यक्तीमत्व भागोजी शेठ कीर यांनी सावरकरांच्या विनवणीवरून स्वतःच्या खर्चाने उभारलेले पतिपावन मंदीर आता थेट भागोजीरोठ करांचे नाव टाकून ते सावरकरांच्या नावे करण्याचा आणि इतिहासाची नोंदय बदलण्याचा होणाच्या या प्रयत्नाबद्दल कीर परिवार, समस्त भंडारी समाज आणि रत्नागिरीकरांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे. मंत्री मंडळात कोकणचे सुपुत्र शिक्षणमंत्री असतांना या इतिहास बदलाची दखल का घेत जाऊ नये ? की काही घटक है प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आहेत का ?
महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक निर्मित व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे यांनी प्रकाशित केलेले इतिहास व नागरिक शाख इयत्ता आठवी या पुस्तकातील पान क्र. २४ वर असे छापले आहे की, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्प जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिराची निर्मिती केली. वास्तवातील इतिहास मात्र खूप वेगळा आहे. आणि त्यामुळे कीराचे नातेवाईक आणि भंडारी समाजाला भागोजी शेठ कीर यांच्या धोर सामाजिक कार्याचा अंतरंगातून अभिमान आहे. अशा सर्वांसाठीच हा सावरकरांना त्यांनी न केलेल्या कार्याचा मान का दिला जात आहे ??
Satyashodhak, dr Babasaheb Ambedkar, Bahujan