आंबेडकरांची ऐतिहासिक संविधान सन्मान सभा

लेखक : प्रदीप ढोबळे

     अंगात ताप, सातत्याने खोकला, अॅंटीबयोटिक्स चा कोर्स आणि डॉक्टर सल्ला की विश्रांती घ्या आणि गर्दी-धुळीपासून दूर रहा. दुसरीकडे टीवि वर सातत्याने बातम्या वंचित बहुजन आघाडीची शिवाजी पार्क वर संविधान सन्मान सभा. वंचित चे नवी मुंबई चे प्रमुख कार्यकर्ते कल्यानराव हनवते ना फोन केला ते म्हणाले साहेब आम्ही दोन वाजतापासून नवी मुंबईतून बसेस काढत आहोत; तुम्हीपन या ; त्यांना तब्येती बाबत सांगितले आणि संविधान सन्मान सभेसाठी शुभेच्छा दिल्या. दोन तास विश्रांती घेतली; संध्याकाळी ६ वाजता उठलो .. अतिशय अस्वस्थ होतो.. नेहमी प्रत्येक भाषणाचा आणि पोस्ट च्या अंती जय भारत जय संविधान लिहिणारा मी संविधान सन्मान सभेसाठी जाऊ शकत नाही. अस्वस्थता नीलिमा समोर व्यक्त केली; ती म्हणाली ठरवल तर तुम्ही काही करू शकता .. बस शर्ट घातल ; फूल बाह्याच काळ स्वेटर घातल ; कोरोंना काळातील काही मास्क शिल्लक होते; मास्क घातला. सोबत बाळासाहेब आंबेडकरांना भेटू शकल्यास भेट द्यावी म्हणून मी लिहिलेल्या मुख्यमंत्री या पुस्तकाची कॉपी घेतली; मराठा आरक्षण : सत्य आणि राजकारण या लेखाच्या १०० झेरॉक्स कॉपी घेतल्या.. टॅक्सी बोलविली आणि शिवाजी पार्क चा मार्ग धरला. थकवा खूप असल्यामुळे टॅक्सीत कधी झोपलो कळलेच नाही .. टॅक्सी वाल्याने दादर टी टी ला झोपेतून उठविले; टॅक्सी वाला म्हणाला सर डिस्टन्स तर फक्त ३ किलोमीटर आहे पण वेळ ५0 मिनिट दाखवीत आहे; रस्त्यावर शिवाजी पार्क कडे जाणारे हजारोंचे पायी लोंढे ; त्या मुळे ट्राफिक जाम .. मोबाइल वर टीव्ही ९ लाईव लावले तर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले भाषणासाठीं उभे राहिले होते. नानाभाऊ म्हणाले बाळासाहेबांनी राहुल गांधीना संविधान सभेसाठी बोलविले पन राहुल गांधी पाच राज्याच्या निवडणुकीत अडकले असल्यामुळे मला राहुलजिनि पाठविले आहे. तेवढ्यात गाडी थोडी पुढे सरकली तर तर टॅक्सी वाला म्हणाला सर टाइम अजून वाढला आहे ५५ मिनिट दाखवीत आहे .. शिवाजी पार्क कडे जाणारे टेम्पो, ट्रॉली, बसेस जिथे जागा मिळेल तिथे पार्क होत होत्या; किंवा हळू हळू सरकत होत्या .. नाना पटोले चे भाषण संपल्यावर बहुदा बाळसाहेबांचे भाषण होईल असे वाटून ; मी टॅक्सी सोडली आणि तब्येत बरी नसतांनी सुद्धा पायी जाण्याचा निर्णय घेतला. पंधरा वीस मिनिटात शिवाजी पार्क गाठले. मैदानाच्या बाहेर आणि आत प्रचंड गर्दी होती. मैदानाच्या बाहेर भोंगयावरून मंडळी भाषण ऐकित होती ; कमीत कमी पाच लाख लोंग संविधान सन्मान सभेसाठी जमा झाले होते. बाळसाहेबांचे भाषण जवळून ऐकता यावे म्हणून पुन्हा कल्यानरावांना फोन केला. त्यांनी सांगितले स्टेजच्या उजव्या बाजूला साऊंड सिस्टिम चे जे भोंगे लागले आहे ; तिकडे या. प्रमुख मंडळिणा बसायची सोय केली आहे. तेथे सोफ्यावर तीनच्या ठिकाणी चार, बसवून तुमच्या बसायची व्यवस्था करतो. संपूर्ण शिवाजी पार्क च्या बाहेरून उजव्या बाजूचा रस्ता कसाबसा दहा मिनिटात एक दुसऱ्याला धक्का धक्का देत देत पार केला. साऊंड सिस्टम च्या जवळ पोहोचलो. पोलिसाना सांगितले विशेष अतिथि चा पास माझ्याजवळ नाही परंतु मला तिथे बोलविण्यात आले आहे. पोलिसानी साफ मन केले. नाकावर मास्क घालून होतो; हातात पाण्याची पुस्तकाची थैली होती. मग मास्क काढून मी पुन्हा पोलिसाना म्हटल मी प्रदीप ढोबळे ओबीसी सेवसंघाचा अध्यक्ष; एक कार्यकर्त्याचा कानावर शब्द गेले; त्यांनी मला निरखून पाहिले; सुरक्षेसाठी नेमलेला तो कार्यकर्ता होता; त्याने पोलिसाना सांगितले .. सोडा त्यांना मी ओळखतो त्यांना .. तरी पोलिसाने फोटो परिचय कार्ड मागितले .. मी दाखविले .. आणि मग त्या कार्यकर्त्या नी मला विशेष अतिथि साठी असलेल्या सोफ्यावर बसविले.

Ambedkaranchi Historical samvidhan Samman Sabha    सभा दहा वाजता पर्यन्त संपवायची म्हणून महाराष्ट्रातील अनेक जिल्हयातून आलेले प्रमुख कार्यकर्ते भटके विमुक्त मुस्लिम ओबीसी मागासवर्गीय तृतीय पंथी यांनी पाच पाच मिनिटात परंतु अतिशय प्रभावी अशी भाषणे दिली. प्रत्येकाच्या आवाजात संविधान प्रेम आणि बाळसाहेबा साठी प्राण झोकून देण्याची निष्ठा होती. भारतीय संविधान आहे म्हणून आज आमचा आवाज आहे ; आमचे अस्तित्व आहे; आणि आज तेच संविधान धोक्यात आहे म्हणून संविधानसाठी कसलाही त्याग करायची भाषा मंचकावरून यायची आणि श्रोत्यांच्या उत्सुर्फ प्रतिसांदाने कधी घोषणेने तर कधी टाळ्याने आसमंत गुंजत होता. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्ष रेखाताई ठाकूर पन बाळसाहेबणी अधिक बोलावे म्हणून थोडाच वेळ परंतु रोकठोक बोलल्या. खरतर ही सभा कोण के बोलतो या पेक्षा संविधान प्रेमी बहुजन समाजाच्या शक्ति प्रदर्शनाची होती. महाराष्ट्राच्या कोना कोपऱ्यातून कार्यकर्ते स्व खर्चावर आलेले होते; यात कुणीही पैसे देऊन वा कुठले आमिष दाखवून आणलेला नव्हता. प्रत्येक जन स्वतच्या आतल्या आवाज ऐकून आला होता. भारतीय संविधान धोक्यात असताना मी जर घरी बसलो तर मी सुद्धा संविधान द्रोही ठरू शकतो; या भावनेतून प्रत्येक संविधान प्रेमी तिथे आला होता आणि त्या सभेच नेतृत्व भारतीय संविधानचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर करीत आहे ही त्यातली महत्वपूर्ण बाब होती.

Ambedkaranchi Historical samvidhan Samman Sabha mumbai    भारतीय संविधानाच्या उडदेशिकेचे सामूहिक वाचन झाले आणि निवेदकणे बाळासाहेब आंबेडकरांचे नाव पुकारले ; बाळासाहेब बोलण्यासाठी माइकवर आले; पाच लाखाची टी सभा पूर्ण शांत झाली. सगळ्यांचे डोळे बाळासाहेबांना बघण्यासाठी तर कान त्याचे शब्द ऐकण्यासाठी टवकरलेले. तेवढ्यात कुठल्या एका कोण्यावरून जयभीम जयभीम चा नारा सुरू झाला आणि सभेतून लाटेसारखा एका दिशेकडून दुसरीकडे गुंजायला लागला; त्यास लगाम लावण्यासाठी बाळासाहेबांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

    संभाच संविधान सन्मानासाठी असल्यामुळे सद्य स्थितीत संविधानाच्या बाबतीत हॉट असलेल्या वेगवेगळ्या चर्चा बाबत प्रश्न भाषणात उभा करण्यात आला. आज काही लोक उघड उघड तर काही लोक दबक्या आवाजात भारतीय संविधान जून झाले आहे म्हणून ते बदललेले पाहिजे असे म्हणतात. संविधान ही राज्य करण्याची व्यवस्था आहे. या व्यवस्थेवर लोकांचा विश्वास आहे .. आणि हा विश्वास सहजासहजी बसला नाही तर या साठी या देशात ७० वर्षाचा काळ जावा लागला. लोकशाही या संविधानाचा मूल गाभा आहे. आपले प्रश्न मिटो की न मिटों ; परंतु ते प्रश्न सरकार पुढे मांडण्याची सोय यात आहे.काही समस्या सुटल्या आहेत ; काही सुटतील अशी आशा आहे ; आणि म्हणूनच वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन लोक करीत असतात. हे संविधान बदळायचे तर नवीन असे काय हे तरी संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्याने सांगितले पाहिजे. त्यांना लोकशाहीच्या ठिकाणी ठोकशाही पाहिजे का ? आज दिवस भर्यात ७ ठिकाणी सरकारने धाडी टाकल्या आणि मागच्या दहा वर्षात हजारो धाडी टाकण्यात आल्या. धाडी टाकण्यात येतात ; चौकशी होत राहते ; परंतु खटले कोर्टात का येत नाहीत ? कारण या प्रक्रियेत धाड टाकलेल्या व्यक्तीस मुकाट्याने राहण्यास भाग पडले जाते; आवाज दाबला जातो; आणि संदेश देण्यात येतो की आमच्या विरुद्ध काही बोलला तर तुमचं आवाज बंद करण्याचे तंत्र आमच्या पाशी आहे. आज असलेल्या संविधानातील निवडक तरतुदीचा गैरवापर करीत जर हे होत असेल तर उद्या हेच संविधान राहिले नाही तर काय होईल हयाचा प्रत्येकाने फक्त अंदाज बांधाव. आणि त्यामुले भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी ही जी जन चर्चा आम्ही घडवून यांनीत आहोत; टी काँग्रेस पक्षाने देशभर घडवावी ह्यासाठीच मी राहुल गांधीना सभेचे निमंत्रण दिले होते. २०२४ ल होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकी आधी ही चर्चा राष्ट्र व्यापी व्हावी हाच या संविधान सन्मान सभेचा मुख्य उद्देश आहे .

    भारतीय संविधान एका भौगोलिक भारत नावाच्या राष्ट्रात लागू झाले आहे ; हिंदू बहुसंख्यकचा देश निर्माण झाला आहे; सत्तर वर्षापासून देश व्यवस्थित कार्यरत आहे; तेव्हा मोहन भागवत कुठल्या अखंड भारताचे स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल करीत आहेत .. अखंड भारत म्हणजे म्हणे थेट अफगाणिस्थान पर्यन्त पोहोचणे .. एक प्रकारे हे दुसऱ्या देशाणा आक्रमण करण्याचा धाक दाखविणे आहे तर दुसरीकडे बहुसंख्यक हिंदूच्या ठिकाणी पुन्हा बरोबरीने हिंदू मुस्लिम झाल्यास .. दोघेनाही एक दुसऱ्याच्या दहशतीत जागविणे होय .. मुसलमानाची दाढी हिंदूच्या हातात आणि हिंदूची शेंडी मुसलमानांच्या हातात .. बाबासाहेबनी आपल्या thoughts on Pakisthan या ग्रंथात संभाव्य धोक्याची संपूर्ण चर्चा केली आहे. पाहिजे असल्यास सर्वांनी हे पुस्तक वाचून पहावे.

    बाबासाहेबांनी या देशातील मंगसवर्गीयांच्या सामाजिक संबलिकरणसाठी आरक्षणाची व्यवस्था दिली परंतु आज त्याच व्यवस्थेचा गैरवापर राजकीय मंडळी करीत आहे ; खतपाणी देऊन ; एक समाजास दुसऱ्या समाजा सोबत भिडविणे चालू आहे .. आधी मणीपुर मध्ये झाले .. आज महाराष्ट्रात ओबीसी मराठा वादातून तेच चालू आहे .. आणि ३ डिसेंबर ल जे निकाल येतील त्या नंतर देशात वातावरण अधिक बिघडण्याचे काम सुरू होऊ शकते ; तेव्हा सर्व सामान्य जनतेने अतिशय सावध राहणे गरजेचे .. नेते भडकवतील .. आणि जनता एकदुसऱ्यावर भिडेल .. तेव्हा नेत्याना म्हणा .. रस्त्यावरच्या मारमारीसाठि पहिले तुझा पोरगा उतरव .. त्यांची पोर उतरणार नाही .. जनतेने लक्षात ठेवले पाहिजे; जनता या देशाची मालक आहे आणि नेते हे त्यांचे सेवक .. त्यामुले जनतेने आपले मालकत्व सहजासहजी नेत्याना बहाल करू नये .. नेत्यानी आपापले धंदे शाबूत ठेवण्यासाठी देशाचा विकासच केला नाही .. आज भारतातून २० लाख विद्यार्थी परदेशात जातात; प्रत्येक विद्यार्थी ४० लाख रुपये खर्च करतो ..हा पैसा करोडोत आहे .. एवढा प्रचंड पैसा देशातून बाहेर जातो .. हाच पैसा येथे विकासासाठी वापरला असतं तर येथेच उच्च दर्जाची शिक्षण व्यवस्था असती .. आणि कमीत कमी २० लाख नोकऱ्या या एका शिक्षण क्षेत्रात निर्माण झाल्या असत्या .. आज असलेल्या प्रचंड बेरोजगरीमुळे मराठा युवकणा वाटत आरक्षणणे आपल्याला नोकरी मिळाली तर आपला विकास होईल .. परंतु आरक्षण हे विकासासाठी नव्हे तर ह्या देशात असलेल्या हजारो मागासलेल्या जाती ना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आहे .. या जाती एकदुसयावर नियंत्रण ठेऊन; एक नियंत्रित प्रशासकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी आरक्षण आहे.

    संविधान सन्मान सभेत जमा झालेल्या ५ लाख जनतेच्या माध्यमातून पुढील राजकारणाच्या समिकरणाची गणित ही इंडिया आघाडीतील पक्षा पुढे बाळासाहेबांनी मांडली. आपल्याला संविधान विरोधी शक्ति ना तर नष्ट च करायचे आहे हे स्पष्टपणे बाळासाहेबांनी मांडले सोबतच नवीन येणाऱ्या सत्तेत आपला मानाचा वाटा असला पाहिजे असे उपस्थित जनसमूहाच्या माध्यमातून लक्षात आणून दिले. मागे पुणे येथे झालेल्या दोन विधानसभेच्या पोट निवडणुकीत एक ठिकाणी वंचित आघाडीने उमेदवार दिल आणि दुसरीकडे नाही. जिथे उमेदवार दिला तेथे भाजपा जिंकली आणि उमेदवार नाही दिला तेथे कॉंग्रेस जिंकली. वंचिताना त्यांचा योग्य वाटा भविष्यात मिळेल का ? हा प्रश्नही ह्या संविधान सभेने उपस्थित केला आहे.

लेखक : प्रदीप ढोबळे, अध्यक्ष ओबीसी सेवासंघ

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Privacy Policy
Terms & Conditions

Our Other Youtube Channel & WebSites About Educationa & History

Discover You
Bharatiya
Discover Abhi
फुले, शाहू, और आंबेडकर की प्रेरणादायक विरासत की खोज करें, phuleshahuambedkar.com पर। सामाजिक सुधार, शिक्षा, और सशक्तिकरण में उनके योगदान को जानें। उन्होंने एक और समृद्ध भारत के रूप में आकार देने वाले ऐतिहासिक और विचारशील दृष्टिकोणों में गहराई में डूबे।

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209