2८ नोव्हेंबर : म. फुले स्मृतीदिन : खरा शिक्षक दिन !

असा साजरा करा शिक्षक दिन ! - सत्यशोधक प्रबोधन महासभेचे आवाहन

     २८ नोव्हेंबर : म. फुले स्मृतीदिन हाच खरा शिक्षक दिन! या मागणी तमाम समतावाद्यांनी केली आणि त्यानुसारचा विविध स्वरुपातील कार्यक्रम महाराष्ट्रभर केले जात आहेत. आपला शिक्षक दिन हा म. फुले यांच्या विचार आणि कार्याशी जोडला गेलेला आहे. विषमतावादी- सनातनी मोवृत्तीचे लोक वेदांती तत्वज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या, स्त्रीद्वेष्टया राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी साजरा करतात. विषमतावादी व्यस्थेला आव्हान देताना तिला सर्व बाजूंनी प्रतिकार करावा लागतो. कारण संस्कृतीचा गैरवापर करत म्हणजे तो ब्राह्मणीकरण करत विषमतावादी व्यवस्था समर्थनासाठी रुढी, परंपरा, चालिरीतींचा आकृतीबंध त्यांनी उभा केला. त्याला प्रतिकार करताना क्रांतिकारी पर्यायी सांस्कृतिक राजकारणाची आवश्यकता असते. म्हणून १९ व्या शतकात म. जोतीराव फुले यांनी पर्यायी अशा सत्यशोधक संस्कृतीचा, सार्वजनिक सत्यधर्माचा पर्याय ब्राह्मणवादाच्या विरोधात उभा केला. २० व्या शतकात मनुवादी - ब्राह्मणी व्यवस्थेविरुध्द संघर्ष करताना डॉ. बाबासाहेबांनी बौध्दमताचा आणि बौध्द संस्कृतीचा क्रांतिमारी पर्याय दिला होता. फुले - आंबेडकरांचे सच्चे अनुयायांनी २५ डिसेंबर: मनुस्मृती दहन दिन हाच खरा भारतीय स्त्रीमुक्ती दिन या मागणीतून क्रांतिकारी पर्यायी सांस्कृति पर्याय उभा केला होता.

Mahatma jyotiba Phule Smruti Din is True Teachers Day - November 28     तेच सच्चे अनुयायी महाराष्ट्रात २८ नोव्‍हेंबरला खरा शिक्षक दिन साजरा करत आले आहेत. यंदाच्या वर्षी हा क्रांतिकारी शिक्षक दिन आपण मोठ्या प्रमाणावर साजरा केला पाहिजे. कारण व्यास, आदिवासी एकलव्याचा अंगठा कापणाऱ्याला गुरू मानणारे, शूद्र शंबुकाची हत्या करणाऱ्या कथांना महत्‍व देत ब्राह्मणी पुरुषसत्ताक संस्कृतीचा पुरस्कार करणाऱ्या शक्ती देशाच्या सत्तेत जाऊन बसल्या आहेत. त्यांच्या संविधानविरोधी, मनुवादी विचार व्यवहारांना करण्यासाठी आपण शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करत ब्राह्मणी मूल्य-संस्कृतीला नकार दिला पाहिजे. हो ! आम्ही विषमतावादी मूल्य -संस्कृतीच्या विरोधात आहोत- या निर्धाराने पर्यायी क्रांतिकारी संस्कृतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकुयात.

     २८ नोव्हेंबर रोजी आपल्या पक्ष- संघटना - संस्थांच्या वतीने शिक्षक दिनानिमत्ति जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करूयात. (१) जाहीर कार्यक्रमात आपण खरा शिक्षक दिनाचे महत्व सांगणारे किंवा म. फुले यांच्या शिक्षण विजारांवर आधारित व्याख्यान आयोजित करू शकता. (२) २८ नोव्हेंबर : म. फुले स्मृतीदिन हाच खरा शिक्षक दिन जाहीर करण्यात यावा असे निवेदन सरकारी यंत्रणांना देऊ शकता. (३) सार्वजनिक ठिकाणी म. फुले यांची प्रतिमा ठेऊन कोपरा सभा घेऊ शकता. (४) समाजाचे शिक्षण करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आयोजित करुन त्यांना सत्यशोधक शिक्षक पुरस्कार देऊन प्रबोधन सभा आयोजित करू शकता. (५) या विषयावर आधारित पुस्तकांचे प्रकाशन व त्यावर परिसंवाद आयोजित करू शकता. (प्रा. प्रतिमा परदेशी, प्रा. श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा विचार यासाठी केला जावू शकतो.) (६) म. फुले - बाबासाहेब आंबेडकर इ. महामानवांच्या प्रतिमा, २८ नाव्हेंबर हाच खरा शिक्षक दिन इ. मागण्यांचे फलक घेऊन प्रबोधन फेरी काढू शकता.

     व्यक्तिगत स्वरुपात (१) आपण २८ नोव्हेंबर या दिवशी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा एकमेकांना द्याव्यात. सामाजिक माध्यमांधुन शिक्षक दिनावर आधारित माहिती, पुस्तकांचा परिचय, ट्रोल, संदेश द्याव्यात. (२) या मागणीचा पुरस्कार करणाऱ्या पुस्तिका भेट द्याव्यात. (३) कुटुंबासह आपल्या गावातील, शहरातील फुले-आंबेडकरांच्या पुतळ्यावर जाऊन अभिवादन करावे. घरातील मुलांना शिक्षक दिनाचा परिचय, महत्व करुन द्यावे.

- प्रा. प्रतिमा परदेशी, मोबा. ९४२३५७३७२५

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Periyar, Bahujan
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Privacy Policy
Terms & Conditions

Our Other Youtube Channel & WebSites About Educationa & History

Discover You
Bharatiya
Discover Abhi
फुले, शाहू, और आंबेडकर की प्रेरणादायक विरासत की खोज करें, phuleshahuambedkar.com पर। सामाजिक सुधार, शिक्षा, और सशक्तिकरण में उनके योगदान को जानें। उन्होंने एक और समृद्ध भारत के रूप में आकार देने वाले ऐतिहासिक और विचारशील दृष्टिकोणों में गहराई में डूबे।

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209