वसमत तालुक्यातील हयातनगर येथे 23 नोव्हेंबर रोजी येथील महात्मा ज्योतीबा फुले चौकात सकाळी 10 वा.हयातनगर व सर्कल मधील ओबीसी बांधवांकडून समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक करण्यात आला.सध्या महाराष्ट्रात आरक्षण आंदोलन तीव्र होत आसतांना काही समाज विघातक लोकांकडून त्यांच्या फोटोला जोडा मारणे,व त्यांच्या फोटोची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढणे व त्यांच्या फोटोला काळे फासणे असे प्रकार होत आहेत.त्या निषेधार्थ हयातनगर येथील ओबीसी बांधवांकडून येथील चौकात एकत्रित येऊन त्यांच्या फोटचा दुग्ध अभिषेक करुन.ओबीसी बांधवांनी त्यांच्या जय जय काराच्या घोषणा देऊन फोटोला दुग्ध अभिषेक केला.या दुग्ध अभिषेक कार्यक्रमाला ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.