भंडारा : ओबीसी सेवा संघ, ओबीसी जनगणना परिषद, भंडाराच्या संयुक्त विद्यमाने येथील गांधी चौकात महासम्राट बळीराजा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
अध्यक्ष म्हणून भैय्याजी लांबट व प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अभिविलास नखाते, उमेश कोरराम डॉ. बालकृष्ण सार्वे, गोपाल सेलोकर, दयाराम आकरे, सदानंद ईलमे मंगलाताई वाहि पुरुषोत्तम समरित उपस्थित होते. डॉ. अभिविलास नखाते यांनी बळीराजाची माहिती सादरीकरण केले. तीन हजार वर्षापूर्वीचा इतिहास समोर आणले एक समतामुलक प्रजाहितदक्ष स्वातंत्र्य प्रेमी, दानवीर, वचनप्रमान्यवादी शेतकरी राजा या जगात दुसरा झालाच नाही, असे प्रतिपादन केले.
दीपावली सणाला आपण घराघरात दिवे लावून बळीला आम्ही सुखी असल्याचे सांगितले जाते. याचबरोबर 'तू सुध्दा आमच्यात चैतन्य भर' अशी विनवणी केली जाते. अमानुषपणे कृत्ये घडवू नयेत म्हणून बळीराजाचे राज्य येऊ दे. या गजरात गांधी चौक परिसर निनादून गेला.
या प्रसंगी विद्याताई दवगडे व संच आर्केस्ट्रा यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. बळीराजाचे जीवनाचा पोवाडा व लोकगीते सादरीकरण करण्यात आले. संचालन रोशन उरकुडे यांनी तर प्रास्ताविक गोपाल सेलोकर यांनी केले स्वागत गोपाल देशमुख यांनी तर आभार संजीव बोरकरांनी मानले.
उपक्रमासाठी रमेश सहारे, ईश्वर निकुजे अरुण जगनाडे, श्रीकृष्ण पडोळे, दयाराम आकरे, उमेश शिंगळे, प्रकाश मुटकुरे, गजानन पाचे, के. झेड, शेंडे, वामण गोंधळे, लक्ष्मीकांत लांजेवार, मनीराम साखरकर, शामली उरकुडे, ललिता देशमुख, लता बोरकर, वृंदा गायधने, सरोज सहारे, योगेश शेंडे, प्रमोद केशलकर व असंख्य बंधू भगिनीनी सहकार्य केले
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Periyar, Bahujan