वटार - महात्मा जोतीराव फुले व सावित्रीमाईंनी स्थापिलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला आज दीडशे वर्षे पूर्ण झाली. कर्मकांड विरहित वैज्ञानिक सत्याव आधारित सार्वजनिक सत्य धर्माची कास धरत आजच्या समाजात फुलेंच्या विचारांची रुजवणूक होतांना दिसत आहे. त्याचाच भाग म्हणून नाशिकमधील बागलाण तालुक्यातील बटार गावी राष्ट्रपिता फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक पद्धतीने बाळाचा नामकरण सोहळा गेल्या १५/११/२०२३ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
वटार गावातील महात्मा फुले सोसायटीचे व्हाइस चेअरमन राहुल रामदास खैरनार यांच्या मुलाचा नामकरण सोहळा हा सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला.
या सोहळ्यास सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक अरविंद खैरनार यांचे मार्गदर्शन मिळाले. तर चाळीसगाव येथील सत्यशोधक माज संघ पुरस्कृत विधीकर्ते भगवान रोकडे हे सत्यशोधक विधी करण्यास आवर्जुन उपस्थित राहिलेत. त्याचबरोबर सोबत सत्यशोधक सुदर्शन जाधव मुंजवाड, नाशिक जिल्हा सिटु सेक्रेटरी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सदस्य सतिश खैरनार आदी न्यवर या सोहळ्यास उपस्थित राहून नवजात बाळाला शुभेच्छा देत या अभिनव उपक्रमाबद्ल खैरनार परिवाराचे आभार मानले. सदर सत्यशोधक नामकरण सोहळा बाळाची आत्या व सत्यशोधक विचारांच्या आदर्श शिक्षिका माधुरी खैरनार (जाधव) यांच्या सहभागाने केला गेला होता.
तसेच संपूर्ण खैरनार रिवारासह सत्यशोधक नामकरण सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी भगवान रोकडे यांनी फुले दाम्पत्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या कार्यपध्दत व आजच्या महागाई काळात आताच्या नव्या पिढीला बहुजन समाजाला कुठल्याही पुजा विधी सत्यशोधक पद्धतीने अवलंब करण्याची आवश्यकता व तात्यासाहेब म. फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या विषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर खंडोबाची तळी भरून सत्यशोधक विधीस सुरूवात करण्यात आली. या सोहळ्यास सत्यशोधकीय कपिल खैरनार उपस्थित होते.
तसेच वटार गावातील पोलीस पाटील किरण खैरनार व डॉ. संजय खैरनार, सुरेश खैरनार, राजेंद्र खैरनार, सचिन खैरनार व संपूर्ण खैरनार परिवारासह सत्यशोधक चळवळीचे पदाधिकारी व कुटुंबीय प्रामुख्याने उपस्थित होते. सदर सत्यशोधक नामकरण विधी वटार गावी प्रथमतः सुरूवात झाली. विषय संपूर्ण नाशिक जिल्हयात चर्चेचा ठरला आहे.
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan