अंबडची महाकाय सभाः ओबीसी इतिहासाचे सुवर्णपान (उत्तरार्ध)

- प्रा. श्रावण देवरे,

     अंबडच्या क्रांती सभेची वैशिष्ट्ये आपण कालच्या ओबीसीनामा - 9 मध्ये वाचलीत. आज मुख्यतः या सभेची जवळची व लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र काय असू शकतात व ते काय परिणाम घडवून आणू शकतात, हे आता आपण पाहू या!

Ambadchi Mahakaya Sabha - Golden Page of OBC History

    पक्षाच्या बैठकीत, मंत्रीमंडळाच्या बैठकीत व ओबीसी नेत्यांच्या सरकार-निमंत्रीत बैठकीत ‘फडणवीस-शिंदे-पवार’ हे मुख्य सत्ताधारी त्रिकूट भुजबळसाहेबांची मुस्कटदाबी करीत होते व त्यांना ओबीसींची बाजू मांडायला बंदी करीत होते. मुख्यमंत्री शिंदे पत्रकारांसमोर उघडपणे भुजबळांना दमबाजी करुन 'भुजबळांनी वाद वाढवू नये' म्हणून समज देत होते. मात्र वाद निर्माण करणार्‍या जरांगेला समज देण्याची हिम्मत मुख्यमंत्र्यांमध्ये नव्हती व आजही नाही. अर्थात मुख्यमंत्री शिंदेंना ‘‘जात-लखवा’’ झालेला असल्याने त्यांचे वाकडे तोंड जरांगेच्या विरोधात बोलायला तयार नव्हते. अशाप्रकारे सत्ताधार्‍यांचा मराठा-फोबीयाचा पारा जसजसा वर जात होता, तसतसा ओबीसी-असंतोषाचा पाराही वर चढत होता. जरांगेच्या मुखातून रोज एक-एक नवीन मागणी बाहेर पडत होती व मुख्यमंत्री शिंदे ती मागणी ओंजळीत झेलून सरकारी जी.आर. काढून लगेच अमलात आणत होते. ना मंत्रीमंडळाची मंजूरी, ना ओबीसी नेत्यांशी चर्चा!

     संपूर्ण राज्य सरकार जरांगेच्या पायाशी लोळण घेत होते. मुख्यमंत्री शिंदे पहाटेच आपल्या हाताची ओंजळी घेऊन जरांगेच्या तोंडाशी धरत होते व जरांगेच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडायची वाट पाहात होते. जे काही पडेल ते झेलायचं आणी जी.आर. काढून अमलात आणायचं, असा रोजचा धंदा मुख्यमंत्र्यांचा होता. टिव्ही, वर्तमानपत्रे सर्व मिडिया दिवसरात्र जरांगेशिवाय दुसरं काही दाखवतच नाहीत. असा हा किळसवाणा मराठा-फोबिया वाढत गेला व ओबीसी असंतोषाचा संयम सुटत चालला होता. तशात मराठा गुंडाच्या शासन-पुरस्कृत गुंडगिरीने जाळ-पोळ, हिंसा व रानटीपणा केल्यामुळे ओबीसी-असंतोषाला भडाग्नी दिला. भडकलेल्या या ओबीसी असंतोषाला नीट-व्यवस्थित मार्ग (सांडवा) उपलब्ध करुन दिला नाही तर आपल्या खुर्च्या भस्मसात होऊ शकतात, याची खात्री या भयग्रस्त त्रिकुटाला झाली. त्यांना या संकटातून मुक्त करील असा एकच ओबीसी नेता महाराष्ट्रात आहे आणी तो म्हणजे- छगन भुजबळ!

     भुजबळसाहेबांनी डरकाळी फोडल्यावर या त्रिकूटाची बोलती बंद झाली. भुजबळांना मुकसंमती देण्याशिवाय या त्रिकुटाजवळ दुसरा पर्याय शिल्लकच नव्हता. त्रिकुटाकडून तात्पुरती मिळालेली सूट म्हणजे भुजबळसाहेबांना मिळालेली सुवर्णसंधीच होती. या संधीचे सोने करीत भुजबळांनी ओबीसी असंतोष संघटित केला व आपल्या स्वतःच्या पाठीमागे उभा केला. त्रिकूटाला याची खात्री होती की, भुजबळांना थोडे जरी मोकळे सोडले तरी ते सूसाट वेगाने धावतील व आपल्याला त्यांच्या मागे-मागे धावावे लागेल. फडणवीस, शिंदे व पवारांनी अशीकाही व्युहरचना केली की, ही सभा मर्यादित व्हावी व भुजबळ आपल्या आवाक्यापेक्षा ‘मोठे’ होउ नयेत. सर्वप्रथम अजित पवारांनी व फडणवीसांनी अंबड-जालना परीसरातील आपापल्या पक्षांच्या ओबीसी नेत्यांच्या मुसक्या आवळून ठेवल्या. मुंडे परीवारातील तिन्ही ओबीसी नेते व मराठा-हिंसाचाराचे बळी ठरलेले जयदत्त क्षिरसागर यांना सभेपासून दूर ठेवण्यात पवार-फडणवीसांना यश आले. बावनकूळेंना या सभेकडे पाहण्याचीही परवानगी नसावी. उपरोक्त ओबीसी नेते या सभेसाठी प्रामाणिकपणे सक्रिय झाले असते तर अंबडची ही सभा 50 लाखांच्यावर झाली असती व शासनावर चढून बसलेला ‘मराठा-फोबिया’ एका मिनिटात खाली उतरला असता

     या सभेमुळे कॉंग्रेसचे मराठा नेते इतके अस्वस्थ झालेत की, त्यांनी वडेट्टीवारांचे कानच पिरगाळले. पक्षातील मराठा मालकांच्या दमदाटीने भयभीत झालेल्या वडेट्टीवारांनी लगेच पत्रकार परीषद घेऊन खुलासा केला की, ‘मी भुजबळांच्या भुमिकेशी सहमत नाही.’ म्हणजे ‘मराठा जातीला ओबीसीमधून आरक्षण नको’, या भुजबळांच्या भुमिकेशी वडेट्टीवार सहमत नसतील तर वडेट्टीवार हे मराठा मालकांशी किती एकनिष्ठ आहेत, याची कल्पना येते. राजकारणात ज्यांचे मालक ब्राह्मण आणी मराठे आहेत, ते आतापर्यंत फुले-आंबेडकरांच्या गप्पा मोठमोठ्याने मारत होते, त्यामुळे त्यांचे मालक मराठा-ब्राह्मण आहेत, यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. मात्र भुजबळसाहेबांनी या सभेतून जे क्षेपणास्त्र सोडले त्यामुळे भयभीत झालेले हे नकली फुले-आंबेडकरवादी उघडे पडले. या सभेतनंतर अनेक राजकीय नेत्यांनी भुजबळांच्या विरोधात बोलण्याचा सपाटा लावला. भुजबळांच्या विरोधात बोलणार्‍या सर्वच राजकीय नेत्यांचे मालक मराठा किंवा ब्राह्मण आहेत, हे उघड झालेले आहे. फडणवीसांच्या मांडीवर बसून भाजपची ‘‘बी’’ टिम म्हणून काम करणारे नेते रोज भुजबळांच्या विरोधात गरळ ओकत होते व आजही ओकत आहेत.

     या महा-सभेचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न फडणवीस-अजित पवार करतील यात वाद नाही. म्हणून निवडणूकीत ओबीसींची नेमकी भुमिका काय असावी, हे सांगण्याचे काम भुजबळांनी करायला हवे होते. परंतू त्यांना मिळालेले सभेचे मर्यादित स्वातंत्र्य पाहता अशा प्रकारची स्वतंत्र राजकीय भुमिका ते या सभेत मांडू शकले नाहीत. त्यांचा हात अजूनही दगडाखाली आहे, हे आपण विसरता कामा नये! आपल्या एक मिनिटाच्या निवेदनात महादेव जानकरांनी हा मुद्दा मांडला याबद्दल जानकरांचे अभिनंदन केले पाहिजे. जानकर म्हणाले की, ‘कॉंग्रेस-भाजपा हे ब्राह्मणांचे पक्ष आहेत, ओबीसी नेत्यांनी ‘रासपा’ मध्ये यावे व सत्ता हाती घायावी’. असे आवाहन जानकरांनी केले, परंतू या मुद्द्याकडे सर्वच ओबीसी नेत्यांनी दुर्लक्ष्य केले, याचे एक कारण हे होते की, तेथे जमलेले बहुतेक सर्वच ओबीसी नेते हे ब्राह्मण-मराठ्यांच्या पक्षांशी एकनिष्ठ आहेत. जानकरांच्या या मुद्द्याकडे सर्वांनी दुर्लक्ष्य करण्याचे आणखी एक कारण हे होते की, ‘खुद्द जानकरच फडणवीसांशी एकनिष्ठ असतील तर त्यांच्यावर व त्यांच्या पक्षावर कितपत विश्वास ठेवावा?’ फडणवीसांच्या कडेवर बसून मंत्रीपदाचे लॉलीपॉप खाणार्‍यावर ओबीसी जनतेने विश्वास कसा ठेवावा? मुद्दा कितीही क्रांतीकारक असला तरी तो मुद्दा मांडणारा माणूसच जर विश्वासार्ह नसेल तर तो क्रांतीकारक मुद्दा व तो मुद्दा मांडणारा माणुसही कचर्‍याच्या टोपलीत फेकला जातो.

     आज महाराष्ट्राच्या ओबीसी जनतेसमोर एकच विश्वासार्ह पर्याय आहे- आणी तो पर्याय म्हणजे ‘‘ओबीसी राजकीय आघाडीचा’’ पर्याय! महाराष्ट्रात सर्वत्र आमच्या सभांना व बैठकांना जो उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे, तो उत्साह पाहता महाराष्ट्राची ओबीसी जनता ‘ओबीसी राजकीय आघाडीचा’ पर्याय स्वीकारते आहे. अंबडच्या महाकाय ओबीसी सभेत आपल्या ओबीसी राजकीय आघाडीच्या उमेदवारांनी आपापली निवडणूक प्रचार-पत्रके आणली होती. किमान एक लाख पत्रके वाटप करून आपल्या उमेदवारांनी 2024 च्या निवडणूकीची पहिली प्रचार फेरी अंबडच्या सभेतच पूर्ण केली आहे. सभेतील अनेक कार्यकर्त्यांनी फोन करून ओबीसी राजकीय आघाडीचे स्वागत केले आहे.

     17 नोव्हेंबरच्या अंबडच्या क्रांतीसभेतून ओबीसी जनतेला एक स्वतंत्र व स्वाभिमानी राजकीय दिशा मिळालेली आहे. ओबीसी नेतेही जर शहाणे असतील तर त्यांनीही आपली लाचार राजकीय भुमिका सोडून ओबीसी राजकीय आघाडीच्या स्वाभिमानी प्रवाहात येऊन सामील झाले पाहिजे.

     या क्रांतीकारी ओबीसी महाकाय सभेची नोंद चळवळीच्या इतिहासात सुवर्ण पानावर लिहीली जाईल. त्यात या सभेसाठी जे प्रामाणिक कार्यकर्ते तन-मन-धनाने रात्रीचा दिवस करून राबलेत त्यांची नावे या इतिहासात नोंद झाली पाहिजेत. प्रा. सत्संग मुंढे यांच्या नेतृत्वाखाली ही सभा यशस्वी करणारे बळीराम खटके, डॉ. अभय जाधव, रविन्द्र खरात, नंदू पुंड, शरद रोठोड, धर्मराज बाबर, उल्हास वाघ, चतुर्भूज मुंढे, संतोष साबळे, स्वदेश साबळे, रामशेठ लांडे असे असंख्य कार्यकर्ते राबलेले आहेत. ही काही नावे प्रातिनिधिक स्वरूपात घेतलेली आहेत. अर्थात या सर्व झुंजार कार्यकर्त्यांच्या पाठीशी एक फार मोठी चालती-बोलती उर्जा काम करीत होती. देशातील एकमेव ‘‘मंडल-स्तंभ’’ ज्यांनी उभारला ते माजी आमदार डॉ. नारायणराव मुंढे हे स्वतःच एक उर्जास्श्रोत आहेत. त्यांच्या प्रेरणेने या कार्यकर्त्यांनी अंबडक्रांतिच्या महासभेचे शिव-धनुष्य लिलया पेलले. त्यांना शतशः अभिवादन!

     सर्वांना जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!

     -प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष,  ओबीसी राजकीय आघाडी,  संपर्कः 94 227 88 546 ईमेलः obcparty@gmail.com

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Privacy Policy
Terms & Conditions

Our Other Youtube Channel & WebSites About Educationa & History

Discover You
Bharatiya
Discover Abhi
फुले, शाहू, और आंबेडकर की प्रेरणादायक विरासत की खोज करें, phuleshahuambedkar.com पर। सामाजिक सुधार, शिक्षा, और सशक्तिकरण में उनके योगदान को जानें। उन्होंने एक और समृद्ध भारत के रूप में आकार देने वाले ऐतिहासिक और विचारशील दृष्टिकोणों में गहराई में डूबे।

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209