पारगाव, दि. १० - नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दौंड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींपैकी १ बिनविरोध व १० पैकी ८ ग्रामपंचायतीवर भाजपा, १ राष्ट्रवादी व १ अपक्ष असा निकाल लागलाला आहे. परंतु केडगाव येथील सुमारे १३ हजार ५०० मतदार संख्या असलेल्या मोठ्या गावात भाजपा व राष्ट्रवादी या दोघांनाही बाजूला ठेवून बहुजन विकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार पूनम बारवकर यांनी ५४४ या विक्रमी मतांची आघाडी घेऊन सध्या चाललेल्या आरक्षणाच्या रणकंदणात ओबीसी समाजाच्या वज्रमुठीचे दर्शन दाखवून दिले. चौफुला येथे 'ओबीसी पर्व, बहुजन सर्व'चा एल्गार दिला. हा नारा दिल्याने तालुक्यातील राजकीय जाणकारांचे त्यांनी लक्ष वेधले.
मोठ्या प्रमाणात लोकसंख्या किंवा मतदार असलेल्या केडगावसारख्या गावात ओबीसी पॅटर्नचा हा निकाल तालुक्यातील नेते मंडळींसाठी चिंतनाचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील सर्व प्रमुख व सर्वपक्षीय ओबीसी उपस्थित दाखविली होती.
ओबीसी पर्व, नेत्यांनी बहुजन सर्व ओबीसी का नारा है, सौ मे से साठ हमारा है आदी घोषणा यावेळी दिल्या.
नुकत्याच ग्रामपंचायतीच्या अनेक गावांमध्ये झालेल्या निवडणुकी ओबीसीच्या एकीचे दर्शन जाणवले आहे. त्यामुळे हा नारा हा तालुक्यातील नेते मंडळींसाठी एक चिंतनाचा विषय बनला आहे. ओबीसी घटक एकाच छताखाली येत असल्याने प्रस्थापितांना धक्का देण्याची शक्यता नाकारता येत आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission