जत दि.१६ नोव्हेंबर २०२३ राज्यातील ओबीसी च्या विविध विषयावर जत तालुका ओबीसी संघटनेच्या कोअर कमेटीची बैठक जत तालुका ओबीसी कार्यालयात संपन्न झाली.मनोज जरंगे पाटील यांचे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी येथील उपोषण सरकारने बळाचा उपयोग करुन हाताळल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागून उपोषणकर्ते जरांगे पाटील यांना सहानुभूती मिळून सरकारने विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या मागण्या आरक्षण सुविधा यांचा कोणतेही कायदेशीर बाबीचा पुर्तता न करता मान्य केल्यामुळे मूळ ओबीसी वर्गाना महाराष्ट्र सरकार पक्षपाती असून दोन समाजात भांडणे लावित आहेत असे वाटू लागल्यामुळें फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्र राज्यात महापुरुषांचे विचार नष्ट करण्याचे उद्योग सरकार करीत आहे असे वाटू लागले आहे.देश स्वातंत्र्य झाल्याबरोबर २६ जानेवारी १९५० पासून अनुसूचित जाती जमाती यांना घटनात्मक आरक्षण तर ओबीसींना स्वातंत्र्याच्या वीस वर्षानी आरक्षण मिळू लागले. सात आगस्ट १९९० साली मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यावर १६नोव्हेंबर १९९२ पासून शिक्षण आणि नोकरी यात वाढ होऊन २७ ℅ आरक्षण सुरू झाले. १९९४ साली ओबीसींना फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेत २७% राजकीय आरक्षण मिळू लागले.आरक्षणाचे जनक फुले, शाहू, आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी आरक्षणासाठी वैचारिक लढा दिला.यापैकी महात्मा फुले माळी आणि शाहू महाराज आणि डॉ. पंजाबराव देशमुख मराठा यांनी आरक्षण मिळण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावले.डॉ. पंजाबराव देशमुख हे देशातील ओबीसी म्हणजे पिछड़ा वर्गाचे अध्यक्ष होते. ते संविधान समितीवर निवडून गेले होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ओबीसी साठी घटनेत ३४० व्या कलमानुसार ओबीसी आरक्षणासाठी आग्रह धरला. त्यामुळे घटनेत ३४० कलमाची तरतूद झाली. एवढेच नव्हे तर देश स्वातंत्र्य झाल्यानंतर महाराष्ट्रात राज्यातील सर्व मराठा समाजाला मराठा मंदिर मुंबई येथील एकत्र बोलवून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण घ्यावे यासाठी प्रयत्न केले.त्यावेळी मराठा समाजातून फार मोठा विरोध झाला. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळू शशकले नाही. आजही तिच अवस्था असून काही लोक आम्ही ९६ कुळी मराठा असून आम्ही ओबीसी नाही असे म्हणतात तर काही आमचा व्यवसाय शेती असून कुणबी सरसकट ओबीसी दाखले मिळावेत अशी मागणी करतात. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या काळात मागणी करणाऱ्यांची संख्या कमी आणि आम्ही ९६ कुळी मराठे म्हणणारे मोठ्या प्रमाणात होते आज ही स्थिती उलटी झाली आहे. महात्मा फुले, आंबेडकर समाज सुधारक होते त्यांनी आरक्षण ही कल्पना समाजात समानता आणण्यासाठी मांडलेली होती. आरक्षण देण्यासाठी अकरा निकशातून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती पाहून आरक्षण दिले.त्याप्रमाणे दहा आयोगापैकी जवळपास सर्वच आयोगाने मराठा समाजाला मागास ठरविले नाही. शेवटचा गायकवाड आयोग सुद्धा सुप्रिम कोर्टाने फेटाळला असून मराठा समाज मागास नाही असा निकाल दिला आहे. तसेच मंडल आयोगाने मराठा समाज मागास नाही असा अहवाल दिला असल्याने कुणबी मागास असून ते आयोगाच्या अकरा कसोटीवर उतरल्याने मागास आहेत. शिंदे फडणवीस सरकार कोणतेही कायदेशीर मार्गाचा विचार न करता असंविधानिक मार्गाने ओबीसीचे न्याय हक्काची पायमल्ली करत आहे. म्हणून राज्यातील ओबीसी वर्गात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
देशातील सामाजिक विषमता दूर करण्यासाठी अनेक महापुरूषांनी कार्य केले.या विषमता, अज्ञान, अंधश्रध्दा यामुळे देश पारतंत्र्यात गेला. आणि स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हजारोनी रक्त सांडून प्राणाची आहुती दिल्यावर, देशाला स्वातंत्र्य मिळाले. आणि त्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाल जगातील श्रेष्ठ आणि सर्वोत्तम संविधान दिले.त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू झाली.संविधान निर्माण करण्यापूर्वी सामाजिक विषमता विरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमता आणि भेदभाव निर्माण करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे दहन करुन मनुवाद नाकारला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सामाजिक विषमतेच्या विरोधात आवाज उठवीला एवढेच नव्हे तर या सामाजिक विषमतेचे मूळ हे वैदिक धर्मात असून वैदिक धर्म मूठभर लोकांनी बहुसंख्य लोकांना स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून घेऊन इतरांना गुलाम करण्यासाठी निर्माण केला आहे असे आंबेडकर यांचे मत होते. अजूनही भारतातील लोकांची गुलामगिरीतून मुक्तता झाली नाही. पन्नास टक्के स्त्रीया ८५% बहुजन यांना गुलामगिरीतून वाटचाल करावी लागते. बाराव्या शतकात विश्वगुरू बसवण्णा यांनी सामाजिक विषमतेचे मूळ वैदिक धर्मात असल्याने वैदिक धर्माचा त्याग करून लिंगायत धर्म स्थापन करून त्याचा प्रचार प्रसार केला.
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची २४ सप्टेंबर १८७३ रोजी स्थापना केली. जमीनदार, शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून , गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. `निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला. महाराष्ट्रात पंतोजी व शेटजींच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्धार केला ज्योतिबा फुले हे क्रांतिकारी नेते असल्याने त्यांच्या वृत्तीशी सुसंगत व धोरणाला पोषक असे तत्त्वज्ञान व विचारपीठ निर्माण करणे त्यांना अत्यंत गरजेची वाटली यातूनच सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान मानतान समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर समाज सुधारणा करण्याचे कार्य केले. समता, न्याय, बंधू भाव यांना मुलस्थानी धरुन संविधान निर्माण केले. परंतू मागच्या दाराने सत्तेवर आलेल्या प्रतिगामी शक्तीना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पवित्र संविधान अडसर वाटत असल्याने छुप्प्या पध्दतीने पवित्र। असे भारतीय संविधान संपविण्याचा घाट घातला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात समता येउन सामाजिक सुधारणा व्हावी म्हणून आरक्षण लागू केले.
महात्मा फुले, यांचे विचार राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्यशोधक समाजाचे विचार महाराष्ट्र राज्यात खोलवर रुजविणे आहेत ते कोणी ही आततायिपणे पायदळी तुडवू नयेत.देशाला एक उत्तम संविधान असून त्यानुसार आपले न्याय हक्क मिळवावेत.
संविधान रक्षण करून प्रतिगामी शक्तीना मोडून काढण्यासाठी जत तालुका ओबीसी संघटनेच्या वतीने संवाद व चर्चा सत्र आयोजित करून संविधान वाचविण्यासाठी लोकजागृती करण्यात येत आहे.याचा एक भाग म्हणून दिनांक १७ नोव्हेंबर रोजी जालना येथे आयोजित ओबीसी एल्गार मेळाव्यात जत तालुका ओबीसी संघटनेचे वतीने मोठ्या संख्येने उपस्तित रहाण्याचे नियोजन करण्यात आले. मराठा आमदार, खासदार,साखर कारखानदार, शिक्षणसंस्था, सहकारी बँका,पत संस्था,बाजार समितीवर मोठ्या प्रमाणात मराठा लोकप्रतिनिधी आहेत हे भारतीय संविधान नुसार तसेच आरक्षण सुध्दा संविधान नुसार मिळविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
या बैठकीत मुख्य मार्गदर्शक म्हणून तुकाराम माळी,मूबारक नदाफ,रविंद्र सोलनकर, अर्जुन कुकडे यांनी चर्चेत सहभागी होऊन विचाराची देवाणघेवाण केली.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission