नागपूर - सिंधू संस्कृतीचे आपण वंशज त्या आहोत. संस्कृतीचा खरा नायक हा बळीराजा होता. जेव्हापासून बळीराजा होता तेव्हापासून ही प्रथा आपल्या पूर्वजांनी चालविली आहे. आतापर्यंत सुरू असलेली परंपरा अधिक जोमाने चालविण्यासाठी युवकांनी पुढकार घ्यावा, असे प्रतिपादन प्रबोधनकार महिला महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. अभिविलास नखाते यांनी आज रविवारी अध्यक्षस्थानावरून केले.
शेतकरी, कष्टकऱ्यांचा राजा महाबली महासम्राट बळीराजाची आठवण म्हणून बळीराजा महोत्सव रविवारी (ता. १९) सकाळी संविधान चौक येथे आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांना बळीराजा सन्मान प्रदान करण्यात आला. शिवाय बळीराजाच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष प्रा. रमेश पिसे, ज्ञानेश्वर रक्षक, प्रा. आनंद मांजरखेडे, कृषीतज्ज्ञ अमिताभ पावडे, बळी राजा क्लबचे संयोजक उमेश कोर्राम, अधिसभा सदस्य राहुल हनवते, विधि सल्लागार अॅड. अंजली साळवे, गोविंद भेंडारकर, जगजित सिंग, नरेंद्र गद्रे, प्रा. आनंद मांजरखेडे, सावन कटरे, अतुल खोब्रागडे उपस्थित होते.
डॉ. नखाते म्हणाले, अलिखित संविधान देणारा पहिला सम्राट बळीराजाच होता. त्यानंतर बळीराजाचे पुढे कार्य समोर नेण्याचे कार्य महान सम्राट अशोक यांनी केले. या काळात समृद्धी होती. भारताला स्वातंत्र मिळाल्यावर बळीराजाचे काम संविधान लिहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. त्यामुळे हे तीन नायक आपल्याला सदैव लक्षात राहिले पाहिजे. बळीराजाविषयी पुढच्या पिढीला संदेश देणे आवश्यक आहे. याकरिता गावागावात अशाप्रकारचे महोत्सव कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बळीराजा सन्मान जीवन गौरव पुरस्कार नागेश चौधरी, दीनानाथ वाघमारे, महिला पुरस्कार हेमलता लोहवे, लेखिका विजया मारोतकर, शिक्षण पुरस्कार एकलव्य इंडिया फाउंडेशन, आकाश नवघरे, पत्रकारिता पुरस्कार प्रमोद गणवीर, राजेश्वर ठाकरे, सुनील ढगे, कृषी पुरस्कार अनंत भोयर, पर्यावरण पुरस्कार प्राची माहुरकर, क्रीडा पुरस्कार ओजस देवतळे, अभिषेक ठावरे, सामाजिक कार्य पुरस्कार छाया सावरकर, वंदना वणकर यांना प्रदान करण्यात आला. महोत्सवात बळीराजा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित गीत सादर करण्यात आले. गुंजन हटवार, संदीप चौहान आणि अविनाश साखरकर यांनी गीत सादर केले. प्रा. रमेश पिसे यांनी विदर्भातील युवकांनी आता जागृत होण्याची गरज असून विदर्भाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच वेगळा विदर्भ हवा यावर त्यांनी जोर दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पियूष आकरे, नीलेश तिघरे, देवेंद्र समर्थ, आकाश वैद्य, नयन कालबांधे, अनुप खडतकर, हर्षल राऊत, समीप नरुले, मनीष गिरडकर यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमेश कोर्राम, संचालन कृतल पियूष आकरे यांनी तर राहुल हनवते यांनी आभार मानले.
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan