एकाच समाजाची बाजू कशी उचलू शकता. तुम्ही राजे शाहू महाराजांचे वशंज आहात. असं म्हणत मंत्री छगन 'भुजबळ यांनी संभाजी राजे यांनी सवाल केला आहे. संभाजीराजे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणासाठी पाठिंबा दर्शविल्यानंतर छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. | जिल्ह्याच्या इगतपुरीमध्ये छगन भुजबळ यांनी सभा झाली. या सभेत त्यांनी पुन्हा मराठा आरक्षणावर भाष्य केलं. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. आम्ही मराठा आरक्षणासाठी कधीच विरोध केला नाही. फक्त ते आरक्षण कोणाचेही न काढता देण्यात यावे, असंही भुजबळ म्हणाले.
काल (शुक्रवारी) छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची संभाजीराजे यांनी मागणी केली होती. सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ? हे स्पष्ट करावे, अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली होती. त्यावरुन भुजबळ यांनी संभाजीराजेविषयी जाहीर नाराजी व्यक्त करुन एकाप्रकारे त्यांना राजधर्माची आठवण करुन दिली आहे.