नागपूर : शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा राजा बळीराजाची आठवण म्हणून बळीराजा महोत्सव येत्या रविवारला संविधान चौकात आयोजित करण्यात आला आहे. रविवार, दि. १९/११/२०२३ | वेळ : सकाळी १० वाजता स्थळ : संविधान चौक, नागपुर.
संत तुकाराम महाराज, संत जनाबाई, महात्मा फुले यांनी बळीराजाचा गौरव आपल्या कविता, अभंगांमध्ये केला आहे. बळीराजा महोत्सवात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांना बळीराजा सम्मान देण्यात येईल व बळीराजाच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रबोधनकार महिला महाविद्यालयाचे डॉ. अभिविलास नखाते राहतील. प्रमुख अतिथी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे, ओबीसी जनमोर्चाचे प्रा. रमेश पिसे, प्रा. आनंद मांजरखेडे, अमिताभ पावडे, राहुल हनवते, अॅड. अंजली साळवे असतील.
बळीराजा सन्मान जीवन गौरव मा. नागेश चौधरी (अध्यक्ष, बहुजन संघर्ष समिती) मा. दीनानाथ वाघमारे ( संयोजक, संघर्ष वाहिनी) महिला मा. हेमलता लोहवे (सामाजिक कार्यकर्त्या ) मा. विजया मारोतकर (सामाजिक कार्यकर्त्या ) शिक्षण एकलव्य इंडिया फाउंडेशन मा.आकाश नवघरे (चेवेनिंग स्कॉलर) पत्रकारिता मा. प्रमोद गणवीर (दैनिक देशोन्नती, नागपूर) | मा. राजेश्वर ठाकरे, दैनिक लोकसत्ता, नागपूर | मा. सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर कृषी अनंत भोयर क्रिडा ओजस देवतळे (तिरंदाज) पर्यावरण प्राची माहुरकर अभिषेक ठावरे (पॅरा तिरंदाज) सामाजिक कार्य छाया सावरकर (महिला संघटिका, अ.भा. अंधश्रद्धा निर्मुलन समिती) | मा. वंदना वनकर (अध्यक्ष सत्यशोधक महिला महासंघ)
बळीराजा क्लब संपर्क उमेश कोर्राम (संयोजक बळीराजा क्लब) ८९२०९३६८७० पियुष आकरे (८६९८१२१६९९) निकेश पिने (९८६०७१५१२१) १६, रेशिमबाग, नागपुर - ४४००२४.
obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission