आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. लाखोंचे मोर्चे निघाले, आम्ही कधीच विरोध केला नाही. दुर्देवाने कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलेपण आम्ही कोणाची घरे, दुकाने जाळली नाहीत. मराठा समाजातील काही पोरासोरांनी गावोगावी गावबंदीचे बोर्ड लावले. आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी. काय रे, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय? पोलिसांना माझे सांगणे आहे, की गावातील गावबंदीचे फलक हटवले पाहिजेत. हे लोकशाहीचे राज्य आहे. अशा शब्दांत ओबीसी नेते तथा राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाची ओबीसीच्या वाट्यातून मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांना अंबड शहरातील पाचोड रोडवरील घाईतनगर येथे आयोजित अतिविराट ओबीसी एल्गार महामेळाव्यातून सडकून टीका करत ठणकावले.
आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. लाखोंचे मोर्चे निघाले, आम्ही कधीच विरोध केला नाही. दुर्देवाने कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले पण आम्ही कोणाची घरे, दुकाने जाळली नाहीत. मराठा समाजातील काही पोरासोरांनी गावोगावी गावबंदीचे बोर्ड लावले. आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी. काय रे, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला काय? पोलिसांना माझे सांगणे आहे, की गावातील गावबंदीचे फलक हटवले पाहिजेत. हे लोकशाहीचे राज्य आहे. आमदार, राजकीय नेत्यांना गावात घ्यायचे नाही, दोन चार पोट्टी बोर्ड लावतात की गावात यायचे नाही आणि धांदल करतात. हे आता चालणार नाही. सरकार आहे की नाही, कायदा आहे की नाही ? आणि तुम्ही पक्षपातीपणा कराल तर ओबीसीसुद्धा गप्प बसणार नाही. ओबीसींच्या जोडीला दलित, मुस्लीम, आदिवासी सर्व एकवटल्याशिवाय राहणार नाही, असा घरचा आहेर राज्यातील सरकारला देत, आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही; आम्हाला आरक्षण संविधानाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले; आम्ही आमच्या हक्काचे खातोय. तुझ्यासारखे सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, अशा शब्दांत ओबीसी नेते तथा राज्याचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाची ओबीसीच्या वाट्यातून मागणी करणारे मनोज जरांगे पाटील यांना अंबड शहरातील पाचोड रोडवरील धाईतनगर येथे आयोजित अतिविराट ओबीसी एल्गार महामेळाव्यातून सडकून टीका करत ठणकावले. ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी होण्यासाठी उपोषण करत राज्य सरकारला वेठीस धरणारे मनोज जरांगे पाटील यांना आव्हान देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील ओबीसी नेत्यांनी शुक्रवारी (दि. १७) जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसी एल्गार महामोर्चा काढला. तेथे भुजबळ बोलत होते. या महामेळाव्याला राज्यभरातील लाखोंच्या संख्येने ओबीसी समाजबांधव, भगिनी हजर झाल्या होत्या. मनोज जरांगे पाटलांनी यापूर्वी घेतलेल्या लाखोंच्या संख्येच्या सभेला हा महामेळावा जोरदार प्रत्युत्तर ठरला. या महामेळाव्याला ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी संबोधित केले. तसेच, काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री महादेव जानकर, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राजेश राठोड, ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, ओबीसी नेते बबनराव तायवाडे, आमदार देवयानी फरांदे यांच्यासह ओबीसीतील प्रमुख नेते प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्व नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या हेतूवर जोरदार टीका करत, ओबीसींच्या हक्काच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे-पालवे यांची अनुपस्थिती मात्र सर्वांना खटकली.
प्रमुख भाषणात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार टीकास्त्र डागले. ते म्हणाले, की देवसुद्धा यांच्या सातबाऱ्यावर लिहिले आहेत, पंढपूरची पूजा अजितदादांनी करायची नाही म्हणजे काय? पंढरपूरचा राजा सगळ्यांचा आहे. विठ्ठल हा कृष्णाचा अवतार कृष्ण यादव म्हणजे ओबीसी, देवाला जात लावायची झाली तर मग तो ओबीसी आहे, असे सांगून, तू माझ्या शेपटीवर परत पाय देण्याचा प्रयत्न करू नकोस, असा इशारासुद्धा भुजबळांनी जरांगे पाटलांना दिला. तसेच ओबीसींची जनगणना करण्याची मागणी करत, ती तातडीने करा, असेही ते म्हणालेत. 'छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या सूनेलादेखील आई म्हणून परत पाठवले. तुम्ही आमच्या महिला पोलिसांवर हात उचलले, लाज वाटली नाही तुम्हाला?', असा घणाघात भुजबळांनी केला. हा ओबीसांचा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही, तालुक्यातालुक्यात मेळावे घ्या, असेसुद्धा ते म्हणालेत. पुढचा ओबीसी मेळावा २६ नोव्हेंबरला हिंगोलीमध्ये होणार आहे, असे सांगून, त्यांनी जरांगे पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सांगितले, की होय मी जेलमध्ये बेसण भाकरीच खाल्ली. पण, मी जे खातो ते माझ्या कष्टाचेच खातो. तुझ्यासारखे सासऱ्याच्या घरी खात नाही.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission