यवत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'जग बदलणारा बापमाणूस' या पुस्तकात मांडलेल चरित्र हे प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा देईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य कुठल्याही एका जाती धर्मासाठी नाही, तर सबंध मानव जातीच्या कल्याणासाठी आहे हे सांगण्यात हे पुस्तक यशस्वी झाले आहे, असे मत इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.
'जग बदलणारा बापमाणूस' या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर आधारित असणाऱ्या प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथे सावित्रीबाई फुले सभागृहात झाले. त्यावेळी डॉ. कोकाटे बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संपादक व पत्रकार अभिजीत कांबळे, समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे इतिहास संशोधक, वक्ते श्रीमंत कोकाटे व अभिनेते किरण माने आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माने यांनी पुस्तकाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
कांबळे म्हणाले, “ जात, धर्म, राज्य, देश, भाषा या पलीकडचे ग्लोबल डॉ. बाबासाहेब आंबेडकर नव्या पिढीला, नव्या शब्दात सांगण्याचे काम लेखक
जगदीश ओहोळ यांनी 'जग बदलणारा बापमाणूस' या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे" हे पुस्तक आजच्या प्रत्येक पिढीने वाचण्याची गरज असल्याचे आयुक्त लोंढे यांनी सांगितले.
यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त जगदीशब्द फाउंडेशन व परिवर्तन सामाजिक संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. जालिंदर राऊत, गंगासेन वाघमारे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. परिवर्तन चे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी आभार मानले.
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission, Savitri Mata Phule