ज. जामोद - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कॉन्व्हेन्ट, सेठ तुळशिराम ढोकणे प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय तथा कला, वाणिज्य, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आसलगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जन्मोत्सवानिमीत्त वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास सरपंच विष्णु इंगळे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा अॅड. सौ. ज्योतीताई अशोकराव ढोकणे, प्रकाशसेठ ढोकणे, दत्तुभाऊ दांडगे, मराठी प्राथमिक शाळा आसलगांवच्या मुख्याध्यापिका भड, शिक्षिका इंगळे, मुन्ना रावणचवरे, विलास बोरले, प्राचार्या ज्योती वानेरे, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रभा इंगळे, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक दाते यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, युगपुरुष स्वामी विवेकानंद, संस्थेचे प्रेरणास्थान माजी आमदार स्व. सेठ तुळशिरामजी ढोकणे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. समायोचीत मनोगतामध्ये संस्कार, सेवा, अभ्यास, वर्तणूक या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी नाटिका, पोवाडे, विविध नृत्य, वेशभूषा स्पर्धा सादर केले. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अतुल उमाळे, विजय बोंबटकार, विठ्ठल भारसाकळे, योगेश गोडाळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. स्वागत गीत प्रगती गायकवाड, पूजा अंभोरे व दिव्या खिरोडकर यांनी सादर केले. प्रास्ताविक प्राचार्या ज्योती वानेरे यांनी केले.सूत्रसंचालन रेणुका भोंगे यांनी तर आभार प्रदर्शन अतुल उमाळे यांनी केले.
Satyashodhak, Mahatma phule, Bahujan, Savitri Mata Phule