वडीगोद्री : आम्ही कोणाला भीक नाही मागत नाही. मात्र आम्हाला मिळालेले आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही साखळी उपोषण करत आहे आम्ही संवैधानिक उपोषण करत आहे. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी वडीगोद्री येथील ओबीसी साखळी उपोषण स्थळी बोलत होते. वडीगोद्री येथे २४ दिवसापासून सुरु असलेल्या ओबीसी साखळी उपोषणाची आज शुक्रवारी (दि. २९) ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते पाणी पिवून उपोषण सोडण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हे आंदोलन उभे केले आहे. मराठा जातीला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, सरकसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीकरण करु नये, जातीनिहाय जणगाणना करावी, या पुरोगामी महाराष्ट्रात ओबीसी समाज अजूनही वंचित आहे. महाज्योतीचा निधी नाही त्यासाठी आम्ही मागणी केली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक शंभर मुला- मुलींचे दोन वसतीगृह सुरु होणार आहे. महाराष्ट्रमध्ये एकूण ७२ वसतीगृह आहेत ज्यांना हॉस्टेल मिळणार नाही त्यांना वर्षाला ६० हजार रुपये देण्यात येणार आहे. ओबीसी झोपलेला नाही. शासनाने जुनाच शासननिर्णय काढला, मात्र आम्ही काही बोललो नाही. ओबीसीतून सरसकट आरक्षणास आम्ही विरोध केल्यामुळे सर्व जिल्ह्यातील ओबीसी समजत जागृत झाल्याचे तायवाडे यांनी सांगितले. आपल्यावर ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्या वेळी आपण एकत्र आले पाहिजे, असे सांगून श्री. तायवाडे यांनी या चळवळीत वडीगोद्रीकरांचे योगदान कमी नाही. अंतरवाली सराटीपासून अर्धा किलोमीटर वर ओबीसी समाजाने उपोषण करणे म्हणजे सगळा महाराष्ट्रतील संपूर्ण ओबीसी जागी झाला आहे. आम्ही संवैधानिक मागतो.. आपल्यासाठी जो सभागृहात बोलेन त्यालाच आपण निवडून द्यायचं आहे. तुम्हाला तुमची ताकत दाखवून द्यायचं आहे, असे ते म्हणाले. यावेळी ओबीसी समाजाचे पदाधिकारी व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.