चंद्रपूर : मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये, ओबीसींची जनगणना करावी, ओबीसींचे ७२ वसतिगृह, आधार योजना सुरु करा, २६ जानेवारीला काढलेली अधिसूचना रद्द करण्यात यावी या मागण्यांना घेऊन सेवाग्राम येथून ओबीसी संकल्प यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा सोमवार १२ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर येथे पोहचणार आहे. दरम्यान, वडगाव ते दीक्षाभूमीपर्यंत ओबीसी बांधव पायी मार्च काढून सरकारचे लक्ष वेधणार आहे.
ओबीसी जनगणना संकल्प यात्रा संयोजक उमेश कोराम, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल डहाके यांच्या नेतृत्वात ही यात्रा निघाली आहे. ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, नांदगाव पोडे, भद्रावती येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले, अशी माहिती अॅड. विलास माथनकर, अॅड. पुरुषोत्तम सातपुते, प्रा. सूर्यकांत खनके, राजू बनकर, अवधूत कोठेवार यांनी दिली.