कसबे डिग्रज : शालेय जीवनातील वय हे संस्कारक्षम असते. या काळात चांगले संस्कार व संगत या बाबी रुजविणे अत्यंत मोलाचे असते. या बाबी चांगल्या रुजल्या नाहीत तर भावी काळात दृष्ट प्रवृत्ती वाढीस लागते. योग्य वेळी जे पेराल तेच अन् तेच उगविते, म्हणून विद्यार्थी जीवनात योग्य वेळी योग्य संस्कार द्या व आदर्शवत नागरिक तयार करा, असे प्रतिपादन मुख्याध्यापक नागेश तेली यांनी व्यक्त केले.
ते शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लि. सांगली येथे मुलांना प्रोत्साहन मिळावे म्हणून देण्यात येणाऱ्या 'विद्योतेजक' पुरस्कार वितरण, आदर्श शिक्षक व सेवानिवृत्त सभासद यांच्या संयुक्त सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमोद पाटील होते तर प्रमुख पाहुणे संस्थेचे माजी चेअरमन मुरलीधर निकम, मुख्याध्यापक आनंदराव दळवी पाटील, सहा. शिक्षक बाबासो पाटील, दतात्रय पाटील होते. प्रास्ताविक विशाल शिंदे यांनी तर पाहण्याचा परिचय अरविंद जैनापूरे यांनी करून दिला.
यावेळी मुरलीधर निकम यांनी शिक्षण सेवक संस्थेचा सुरुवातीपासूनचा सर्व लेखा जोखा मांडला. आभार प्रा. राणी यादव, सुत्रसंचलन संगिता पाटील यांनी केले. यावेळी सेक्रेटरी संजय कुंभार, संचालक संतोष नाईक, बजरंग धारणे, नितीन जाधव, धनपाल यादव, निलांबरी पाटील, राजेंद खांडेकर, संताजी घाडगे, राजाराम पाटील, आनंदा घोडे, आदी उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan