अमरावती - दि. १३ धनगर आरक्षणाची दिशा ठरविण्यासाठी विदर्भ धनगर परिषद' या कोअर कमिटीचे गठण व कमिटीच्या अध्यक्षपदी अँड. दिलीप एडतकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्याध्यक्ष म्हणून माजी आमदार हरिदास भदे, संघटक सचिव प्रकाशराव नवरंगे, समन्वयक म्हणून पुरुषोत्तम डाखोरे यांची निवड करण्यात आली.
सकल धनगर समाजाची विदर्भस्तरीय सभा पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मृती भवन, दस्तूरनगर अमरावती राज्यस्तरीय धनगर समाज उपवधू परिचय मेळाव्याची आयोजक समिती व सकल धनगर समाज अमरावती यांच्यातर्फे माजी आमदार हरिदास भदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात उपरोक्त निर्णय घेण्यात आला. प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची पूजन करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर मार्गदर्शक विदर्भ दैनिक म्हणून, मतदाराचे संपादक अँड. दिलीप एडतकर, पुरुषोत्तमराव डाखोरे (नागपूर), रमेश गणेशराव प्रकाशराव नवरंगे (दारव्हा), डॉ. रमेशराव महानुर, ज्ञानेश्वरराव ढोमणे सुभाषराव गोत्रे, केशवराव पातोंड (अकोला), प्रा. नरोटे (नेर), वसंतराव ढोके ( यवतमाळ), उमेशराव घुरडे, अरुणराव लांबाडे (वर्धा), सुरेश मुखमाले (वाशीम), अशोकराव हटकर
(बुलढाणा) उपस्थित होते.
नागपूर हिवाळी अधिवेशनावर सकल धनगर समाजातर्फे ११ डिसेंबरला काढण्यात आलेल्या मोर्चाची सरकारने पाहिजे त्या प्रमाणात दखल घेतली नाही, याबाबत या सभेत विचारमंथन करण्यात "अमने मोर्चाच्या आले. नागपूर चमूने यशस्वीतेसाठी तन, मन, धनाने मेहनत घेतली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देण्यात आले. तत्पूर्वी मोर्चा आयोजकांची १४ डिसेंबरला मुख्यमंत्र्यासमोर मिटींग घेण्यात आली. त्यामध्ये आदिवासींना ते धनगर यावर चर्चा करण्यात आली. परंतु अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची यावर चर्चा झाली नाही. आता पुढील दिशा आणि दशा ठरवण्यासाठी व चर्चा करण्यासाठी या सभेत मंथन करण्यात आले.
सभेला प्रत्येक जिल्ह्यामधील धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. आरक्षणासाठी पुढील रणनीती कशी असेल, यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. रणनीती आखण्यासाठी एक कोअर कमिटी असावी, असे सर्वानुमते ठरवून 'विदर्भ धनगर परिषद' या कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली. कोअर कमिटीमध्ये पदाधिकारी म्हणून ज्ञानेश्वरराव ढोमणे, अशोकराव हटकर, सुभाषराव गोहोत्रे, डॉ. रमेशराव महानूर, वसंतराव ढोके, प्रबोधीनीताई मुंदाने, गणेशराव पावडे, रमेशराव पाटील, अरुण लांबाडे, केशवराव ड प्रमोदराव कापडे, भास्कर उपडे, सुषमाताई कानडे, सुरेश मुखमा, अँड. आचल कोल्हे, रमेशराव पाटेकर, प्रकाशराव वाढे, जानराव घट रामकृष्ण ढोले, शाम "शाम बोबडे, उमेश घुरडे यांची विदर्भ धनगर परिषदेवर निवड करण्यात आली. विदर्भ परिषदेवी जिल्हा, तालुका व गावस्तरावर स्थापना करून पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल. १५ जानेवारीला नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांना एस.टी. आरक्षणाविषयी स्मरण म्हणून निवेदन देण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
सभेच्या यशस्वीतेसाठी अमरावती राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजक ज्ञानेश्वरराव ढोमणे, काशिनाथ फुटाणे, राजूभाऊ डांगे, अशोकराव इसळ, अरुणराव बांबल, सुभाषराव गोत्रे, जनार्दन घुरडे, मनोहरराव पुंनसे, नामदेवराव खैरकार, वासुदेवराव पाठक, डॉ. अविनाश मोहोड, ढोमणे, भास्करराव दिनेशराव बांबल घोडस्कर, सुधाकरराव साथ, पुनसे, महाराज मातकर, प्रकाशराव बानी केले. दादाराव उघडे, सतीशराव तिडके, सुभाषराव धरणे, भास्करराव डेवले, रामभाऊ मुंदाने व इतर समाज बांधवांनी सहकार्य केले. प्रास्ताविक ज्ञानेश्वरराव ढोमणे यांनी व संचालन संगीताताई साब यांनी केले. आभार राजू डांगे सभेला विदर्भातून सर्वश्री प्रमोदराव कापडे, रमेशराव ढवळे, विनायकराव अवघड, शंकरराव ढवळे, रामेश्वर निघोट, धर्मेंद्र गायनर, जानराव मुंदाणे, रामकृष्णजी दाढे, रामकृष्ण कवाने, भिमरावजी चारथळ, अशोकराव गोरडे, जानराव घटारे, अविनाश बोबडे, संतोषराव साथ, मनोजराव कचरे, शाम बोबडे, अँड. आचल कोल्हे, अमीत महात्मे, अनिल जोगी, अनिल ईसळ, रामदास काळे, दादाराव पुनसे, गायनर, शारदाताई ढोमणे, संगीताताई साव, प्रियाताई सरोदे, दिमीताई ढवळे, जयाताई अवघड, शालीनीताई उपडे, रेखाताई अवघड, रेणुकाताई ढोमणे, मुकुंदराव पुनसे, प्रशांतराव गोडसे, दिलीपराव घुरडे (तिवसा), दिनेशराव उपडे, मोहनराव पवार, प्रविण डाखोडे, नितीनराव गोत्रे (परतवाडा), ओंकारराव ऊंदरे, .भाऊराव गाढवे (धामणगाव), अशोकराव नवलकर (दर्यापूर), दादारावजी घुरडे (चांदुररेल्वे), रमेशराव पाटेकर (नांदगाव खंडेश्वर), प्रकाशराव दाते, पांडुरंग कावळे, चंद्रशेख ढोके, तिरकर, श्रीकृष्ण राऊत, वसंतराव पांडुरंग "चितळकर, (यवतमाळ), पंकजराव दादे प्रकाश नवरंगे (दारव्हा), भास्कर उपडे, प्रा. सदाशिवराव नरोटे नरोटे, रविभाऊ (नेर), शोभाता मुंदाणे, शिवदास कोल्हे, केशवराव पातोंड (अकोला), डॉ. शोभाताई मुंदाणे, प्रमोदीनीताई' बचे, मोहनराव की व पशुसंवर्धन, सभापती, जि.प अकोला, सुरेशराव मुखमा (वाशीम), खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव हटकर (बुलडाणा), बाभूळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष डॉ. रमेशराव महानुर (बाभूळगाव), अरुण लांबाडे (वर्धा), अँड. रामकृष्ण सांभारे, रामेश्वर लांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम डाखोरे (नागपूर), रमेशराव पाटील, गणेशराव पावडे, देविदासराव आगरकर तसेच प्रकाशराव बारे (उमरेड) यांच्यासह समाज बांधव, भगिनी या बैठकीला उपस्थित होत्या.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan