सातारा - ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक च सामाजिक क्षेत्रातील क्रांतिकारक योगदान आहे. त्यामुळेच ज्ञानदानाची कवाडे खन्या अर्थाने सर्वांसाठी खली झाली आहेत. असे प्रतिपादन बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांनी केले. येथील छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. तेव्हा प्रमुख अतिथी म्हणुन पाटणकर वाचनालयाचे संचालक बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल बीर मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ट साहित्यिक संचालक डॉ. राजेंद्र माने होते. यावेळी अरुण माने, एच. व्ही. वाळंबे आदी मान्यवर उपस्थीत होते.
अनिल वीर म्हणाले, "मुलींसाठी व अस्पृश्यांसाठी शाळा चालू करणारे पहिले भारतीय फुले दाम्पत्य होय. त्यांनी शिक्षणात नवे पर्व सुरु केले होते. मुलींच्या शाळांच्या पहिल्या भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून ज्ञानज्योती यांचे स्थान आहे. शाळांसाठी अभ्यासक्रम नियोजन (curriculum planning) करणाऱ्या व अभ्यासक्रम तयार करून राबविणाऱ्या पहिल्या शिक्षणतज्ञही त्या होत्या. अभ्यासक्रम नियोजन हा विषय आज शिक्षणशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकवला जातो सर्व शैक्षणिक कार्य विनामूल्य करणाऱ्या पहिल्या अध्यापिका होत्या. शिक्षणामध्ये शारीरिक शिक्षणाचा अंतर्भाव करणाऱ्या पहिल्या अध्यापिका होत्या. शाळेत कथाकथनाची खास तासिका ठेवणाऱ्या व आनंददायी शिक्षणाच्या पहिल्या प्रवर्तक राज्य सरकारने आनंददायी शिक्षण ही योजना अलीकडे राबवण्यास घेतली आहे. त्यांनी बहुजनांसाठी देशातील पहिली “नेटिव्ह लायब्ररी" काढली होती. त्यांनी पहिले अध्यापक प्रशिक्षण केंद्र "नॉर्मल स्कूल" काढले व चालवलेही होते. त्यातूनच “फातिमा शेख” ही पहिली मुस्लीम शिक्षिका तयार करण्याचे श्रेयसुद्धा सावित्रीबाई व जोतिबा यांना जाते. पुणे व आजूबाजूंच्या 18 शाळांचे संचालन करणाऱ्या पहिल्या संचालिका होत्या. विद्यार्थ्यांना गणवेश पुरविणाऱ्या पहिल्या संचालिकाही होत्या. सह-शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या पहिल्या शिक्षण- तज्ञ. त्यासाठी वेताळ- पेठेत सह-शिक्षण देणारी शाळा काढली होती. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे. यासाठी त्यांना विद्यावेतन (स्कॉलरशिप) देणे सुरु करणाऱ्या पहिल्या अध्यापिका. गरीब घरांतील मुले शाळेत यावीत म्हणून त्यांना खायला देण्याचा उपक्रम राबविणाऱ्या पहिल्या अध्यापिका. सरकार अलीकडे हा उपक्रम राबवीत आहे. प्राथमिक स्तरापासून इंग्रजीचा पुरस्कार करणाऱ्या व राबविणान्या पहिल्या अध्यापिका. विद्यार्थ्यांचे शिक्षण व त्याचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या समस्याविषयी पालकांचे समुपदेशन करणाऱ्या पहिल्या समुपदेशक, विकसित देशांत शाळाशाळांत समुपदेशक असणे आवश्यक आहे. सरकार तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेल्या पहिल्या भारतीय अध्यापिका ठरल्या. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी घरी विनामूल्य वसतिगृह चालवणारे पहिले दाम्पत्य होते. विधवा स्त्रियांसाठी वसतिगृह काढणारे पहिले दाम्पत्य. फुले दाम्पत्याने सर्वप्रथम प्रौढांसाठी प्रशिक्षण वर्ग काढले होते.
शेतकरी, कामकरी यांच्यासाठी त्यांनी रात्रशाळा काढल्या होत्या. सावित्रीबाई व जोतीराव यांनी आपल्या शाळेत शिकलेल्या सी. धुराजी आप्पाजी व रानबा यांना शिक्षक बनवले होते. याप्रकारे भारतात दलित व्यक्तीना सर्वप्रथम शिक्षक बनविण्याचा मान फुले दाम्पत्यांना मिळतो. आधुनिक, वैज्ञानिक, मानवतावादी व धर्मनिरपेक्ष शिक्षणाच्या पहिल्या पुरस्कर्त्या. आधुनिक काव्याच्या जनक. 'काव्यफुले' व 'बावनकशी सुबोध रत्नाकर' हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले होते. अस्पृश्यांना स्वतःच्या घरची पाण्याची विहीर व हौद खुला करून देणारे पहिलेच दाम्पत्य ठरले होते. पतीच्या चितेला अग्री देऊन सर्व अंत्यसंस्कार करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या. सत्याशोधक समाजाच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.
1896 साली पोटासाठी दुष्काळात शरीरविक्रय करणाऱ्या बायांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून सावित्रीबाईंनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. 1876 च्या दुष्काळात उपासमार झेलणाऱ्या हजारो मुलांसाठी मातृप्रेमाने 52 अन्नछत्रे चालवणारी एकमेव माता. 1896 च्या दुष्काळातही अशी अन्नछत्रे चालविली. बहुजनांची चळवळ चालविणाऱ्या पहिल्या महिला पुढारी. भारतीय महिला मुक्ती व महिला सबलीकरण आंदोलनाच्या पहिल्या नेत्या महानायिका ठरल्या होत्या. " याशिवाय, वीर यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. राजेंद्र माने म्हणाले, "आज स्त्री ज्या वेगवेगळ्या पदावर विभूषित होऊन कार्यरत होत आहे. या पाठीमागे स्त्री शिक्षण देण्यात सावित्रीबाईंचा हात आहे. समाजाशी तीव्र लढा देऊन स्त्रीला शिक्षित करण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला नसता तर तिची अवस्था शिक्षणाविणा काय झाली असती ? हा प्रश्न आहे. सत्यशोधक समाजाचा मोठा आधारस्तंभ सावित्रीबाई फुले होत्या त्याचप्रमाणे सावित्रीबाईंच्या पाठीमागे ही महात्मा फुले खंबीरपणे उभा होते. त्यामुळे हे कार्य पुढे जाऊ शकले. भिडे वाड्यात फुले कुटुंबियानी स्त्री साठी शाळा सुरु केली. त्यामुळे पुढच्या काळात स्त्री शिक्षणाची पुढची वाट सोपी झाली. सावित्रीबाईनी चांगलं लेखन तर केलं आहेच. पण त्याचबरोबर त्यांनी काव्यही केलं आहे. त्या दृष्टीने त्या प्रतिभावान होत्या."
वाचनालयाच्या ग्रंथपाल रुपाली मुळे यांनी प्रास्ताविक केले. माधव सरमोकदम यांनी सूत्रसंचालन कलेढोणकर आभारप्रदर्शन केले. अन्वेशा यांनी या कामी, विष्णू घावडे, विजय दळवी आदींनी अथक असे परिश्रम घेतले. सदरच्या कार्यक्रमास संचालक, विश्वस्थ कर्मचारीवृंद, वाचक, नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan