हिमायतनगर, दि. ५ : राज्य शासनाकडून होत असलेली राज्य घटनेची पायमल्ली चिंतेचा विषय ठरत असून, आपल्या आर्थिक, सामाजिक न्यायासाठी ओबीसींनी आता जागरूकपणे लढा उभारावा. आपल्या आरक्षणाचा वाटेकरी कुणी होवू पाहत असेल, तर ते ओबीसींनी खपवून घेवू नये, आपल्या न्याय हक्कांसाठी जागरूक होवून, शासनाच्या विरोधात लढा उभारला जात असून नरसी येथे दि. ७ जानेवारी रोजी होणाऱ्या ओबीसी जनजागरण एल्गार मेळाव्याला हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ओबीसी समाजाचे नेते अॅड. सचिन नाईक यांनी केले आहे.
हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृहात दि. ४ जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीत नरसी येथे होणाऱ्या महामेळाव्यास मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याबाबत चर्चा व नियोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ. दामोधर राठोड व प्रभाकर मुधोळकर यांनी केले. तर सूत्रसंचालन बाबाराव जरगेवाड यांनी केले. आभार सुभाष शिंदे यांनी मानले. यावेळी बळीराम देवकते दिलीप राठोड. काईतवाड, संजय काईतवाड बाबाराव जरगेवाड, डॉ. सुनील ढगे, आनंद मुतनेपवाड, अभिषेक बकेवाड आदींची उपस्थिती होती.