जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सीमा बोके यांचे आवाहन
अमरावती - जिजाऊ जन्मोत्सव सोहळा दरवर्षी १२ जानेवारीला मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे भव्यदिव्य स्वरूपात साजरा होत असतो. या उत्सवासाठी सर्वांनी मातृतीर्थावर लाखोच्या संख्येने सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा शिवमती सीमा बोके यांनी केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव म्हणजे बहुजनांच्या अस्मितेचा उत्सव आहे. जिजाऊंच्या मार्गदर्शनातून अठरापगड जाती-धर्माच्या लोकांना एकत्र करून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. त्यामुळे हे सोनेरी दिवस आज सर्वांना दिसत आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांचे आपल्यावर अनंतकोटी उपकार आहेत. त्यामुळे थोडं का होईना त्यातून उतराई होण्यासाठी आपण सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाला गेले पाहिजे. तिथे जाऊन मातृतिर्थाची पायधूळ मस्तकी लावली की पुन्हा नव्याने काम करण्याची ऊर्जा मिळते.
दरवर्षी दहा ते बारा लाख मातृतीर्थावर येत असतात. केवळ जिजाऊ जयंतीपुरता हा कार्यक्रम मर्यादित नसून या ठिकाणी मिळणारी वैचारिक मेजवानी ही प्रत्येकाला प्रेरणा देणारी असते. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने १२ जानेवारी २०२४ ला मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे यावे, असे नम्र आवाहन सीमा बोके यांनी केले आहे.
Satyashodhak, Rajarshi Chhatrapati shahu maharaj, Bahujan