केज - देशात दिवसे दिवस महागाई तरुणांच्या हाताला काम नाही, देशात एकतर्फी हुकूमशाही वाढत असून देशात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून, शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या प्रश्नावर बीड जिल्ह्यातील डावी आघाडीची नुकतीच जिल्हास्तरीय बैठक केज येथे झाली असुन महागाई, बेरोजगारी, रोखण्यासाठी आणि शेत मालाला किफायतशिर हमीभाव मला पाहिजे आदी प्रश्नावर डावे पक्ष आक्रमक झाले असून महागाई रोखण्यासाठी देशातील शेतकरी कष्टकरी कामगार यांना वाचवण्यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष,भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) भारतीय कम्युनिस्ट पक्ष (डाव्या आघाडी) ने पुढाकार घेतला आहे. देश बचाव चा नारा दिला असून येत्या काळात डाव्या आघाडीच्या वतीने व्यापक लढा उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून सर्वांनी खंबीरपणे डाव्या आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले.
लवकरच गाव पातळीवर तालुका पातळीवर मेळावे घेऊन आणि देशातली अराजकता सामन्या लोकांन समोर मांडणार आहेत, लवकरच प्रमुख कार्यकर्त्यांचा बीड येथे मेळावा होणार आहे,बैठकीचे अध्यक्ष कॉ अजय बुराडे होते यावेळी कॉ नामदेवराव चव्हाण, भाई मोहन गुंड, भाई विष्णुपंत घोलप, कॉ. बब्रुवान पोटभरे, भाई बाळासाहेब घुमरे, अॅड. भाई गोले पाटील,कॉ.ज्योतीराम हुरकुडे, कॉ अशोक थोरात, कॉ याकुब सय्यद, कॉ काशीराम सिरसट, कॉ यासिन शेख,कॉ नागनाथ रांजवन कल्याण चाटे गोविंद साळवे इतर प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे नियोजन शेकाप तालुका कमिटी चे भाई अशोक रोडे,भाई महेश गायकवाड भाई मंगेश देशमुख यांनी केलं होते.