उदगीर - संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रातील लोककलावंताची कला जिवंत राहावी यासाठी अहोरात्र धडपडणारा एक उमदा तरुण सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून, राजकीय वर्तुळात एक वेगळा ठसा उमटवणारा लोककलावंत प्राध्यापक तथा लेखक कवी राजकुमार घुले.
विदर्भातील लोककला जिवंत ठेवण्यासाठी कलेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी वडीलोपार्जीत कार्य अविरतपणे चालू राहावं यासाठी ज्यांनी बिडा उचलला ते, राजकुमार घुले हे विदर्भ प्रांत लोककलावंताच्या गळ्यातील ताईत बनले. विदर्भातील जवळपास ५० हजार लोक कलावंतांना एकत्र करून प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लोक कलावंतासाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. त्यात पारंपारिक लोक कलावंतांनी आपले भजन ,कीर्तन, दहाका, लावणी, नृत्य, भारुड, दंडार, शाहीर, विविध गुणदर्शनांचे सादरीकरण करून रसिक मंडळींना अक्षरशः वेड लावलं.
विविध कलावंतांना एकत्र करून त्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी शासन दरबारी आवाज उठवण्यात आला. लोककलावंतांना हक्काची पेन्शन मिळावी म्हणून नागपूर विधानभवनावर निवेदन देण्यात आले. आज राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारे अनेक उपक्रम, समाजासाठी दुर्गामी उपयोगी पडतील असे वाटते. येत्या दोन जानेवारी २०२४ रोजी पार शिवनी भव्य अशा लोककला सेवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. याच मेळाव्यात लोकला सेवा मंडळ ऑल इंडिया यांच्या कार्यात स्वतःला वाहून घेणाऱ्या मा. राजूजी पोद्दार, मा. विजय आकोट, मा. सुधाकर मेंगर, मा. सुभाषजी तगाळे मा. अंबादास आलमखाने, मा. जाफर अमानुल्ला खान, मा. मनोहर धनगरे, मा. गौरीशंकर गजभिये, सौ. प्रमिला वाकोडे, मा. यशवंत डहाके महाराज, मा. बालाजी सुवर्णकार, मा. सुधाकर दापकेकर या दिग्गज मंडळींना राष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापकाची नौकरी करत असताना आपणही काही समाजाचा देणं लागतो. ही रक्तातील समाजाविषयीची निष्ठा, देशप्रेमांची नितांत आवड, या उत्कृष्ट गुणाची जोपासना करताना राजकीय क्षेत्रातही विदर्भच नव्हे तर मराठवाडा आणि कोकण यात आपले नावलौकिक मिळवणारे एकमेवाद्वितीय प्राध्यापक राजकुमार घुले. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या अलौकिक कार्याची दखल घेऊन त्यांना विधान परिषदेवर निवड करुन समाजाची सेवा करण्याची उत्कृष्ट संधी द्यावी. अशी मागणी महाराष्ट्र, विदर्भ, कोकणातून जोर धरू लागली आहे. त्यांच्या या कार्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या सौभाग्यवती दर्शनाताई घुले राष्ट्रीय महासचिव, श्वेता ताई रहागंडाले राष्ट्रीय कोषाध्यक्ष बाबुरावजी दुपारे, राजीवजी पोतदार साहेब, रमेश जी मानकर साहेब, सुभाषजी तगाळे, बालाजी सुवर्णकार, अंबादास आलमखाने, सुधाकर दापकेकर, पुरुषोत्तमजी येवले, युवराजजी मेश्राम, अंजलीताई मिसाळ, निशाताई खडसे, शिल्पाताई बोर्डे, शेषरावजी केदार, आनंदरावजी ठवरे, आदी मान्यवर व दिग्गज मंडळी पाठीशी खंबीर आहेत. त्यांचा हा विजयी रथ असाच पुढे चालु ठेवण्यासाठी सबंध महाराष्ट्रातील लोक कलावंत सोबत आहेत. त्यांच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व राजकीय कार्यासाठी लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय प्रसिद्ध प्रमुख सुभाषजी तगाळे यानी लोककला सेवा मंडळांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या आहेत.