उदगीर -: लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया द्वारा आयोजित कलावंतांचा मेळावा पार्श्विनी जिला नागपूर येथे २ जानेवारी २०२४ रोजी सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत हजारो लोककलावंतांच्या साक्षीने संपन्न झाला. लोकशाहीर भाऊराव भाऊ पांडुरंग उमाजी घुले यांच्या स्मरणार्थ माननीय प्रा. राजकुमारजी घुले राष्ट्रीय अध्यक्ष लोक कला सेवा मंडळ, ऑल इंडिया तथा राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी बहुजन महासंघ यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला. महाराष्ट्रातील लोककला जिवंत राहावी. तळागाळातील समाजात दडलेल्या लोक कलावंतांना व्यासपीठ मिळवून द्यावं. कलेची, अबालवृध्दांना आवड निर्माण व्हावी. कलावंतांना शासन दरबारी न्याय मिळावा. हा हा दूरगामी हेतू डोळ्यासमोर ठेवून विदर्भात माननीय प्राध्यापक राजकुमार घुले साहेब यांनी एक कल्पवृक्ष लावला आहे. जिथे लोक कलावंतांना आपल्या सर्व मनीषा पूर्ण करता येतील. गेल्या तीन चार पिढ्यापासून हे घुले परिवार लोक कलावंतासाठी न्याय व हक्काची लढाई लढत आहेत. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी विदर्भच नव्हे तर सबंध महाराष्ट्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. लाखो लोककलावंतांचे एक नेटवर्क तयार झालं आहे.
याच मेळाव्यात ११ लोककलावंत व लोककला सेवा मंडळात स्वतःला वाहून घेतलेल्या ११ सन्मानित व्यक्तींना लोकशाहीर भाऊराव भाऊ पांडुरंग उमाजी घुले "जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकल सेवा मंडळांच्या राष्ट्रीय महासचिव सौ. दर्शनाताई घुले, कोषाध्यक्ष श्वेताताई रहागंडाले, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री मनोहर धनगरे, श्री बाबाराव दुपारे महाराष्ट्र अध्यक्ष, उपाध्यक्ष बालाजी सुवर्णकार, राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख श्री सुभाष तगाळे, नागपूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व लोककलावंत या मेळाव्यास हजर होते. लोककला सेवा मंडळांनी आपल्या कलेचं सादरीकरण केले त्यांना सन्मानपत्र देऊन कौतुक करण्यात आलं. मेळाव्यात भजन, भक्तीगीत, भारुड, अभंग, डहाका, लावनी, लोकगीतांचं सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. लोककला सेवा मंडळात स्वतःला वाहून घेतलेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Bahujan