उदगीर:- लोकसेवा मंडळ (ऑल इंडिया), प्रा. राजकुमार घुले पाटील संस्था नागपूर, जनजागृती कलंगी शाहीर मंडळ मोहारी, संस्कार युवा बहुउद्देशीय संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही भाऊराव व भाऊ पांडुरंग उमाजी घुले टीव्ही रेडिओ फिंगर यांच्या समृद्धी दिनानिमित्त महाराष्ट्रातील लोककलावंतांचा भव्य मेळावा दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत दत्त टेकडी पारशिवनी तालुका पारशिवनी जिल्हा नागपूर येथे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. राजकुमार घुले, उद्घाटक म्हणून राजीव पोद्दार, प्रमुख पाहुणे म्हणून मा. अरविंद जयस्वाल, मल्लिकार्जुन रेड्डी, अरविंद गजभिये, यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा लोककलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याप्रसंगी महाराष्ट्रातील कलावंतांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय कार्यकारणीचे पदाधिकारी माणिकराव देशमुख, वेंकटराव गजभिये, सौ. दर्शना घुले, सौ श्वेता बोपचे, मनोहर धनगरे, बाबुराव दुपारे, सुभाष तगाळे, बालाजी सुवर्णकार यांनी केले आहे. याप्रसंगी लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचे सातत्याने कार्य करून लोक कला सेवेचा उच्चांक गाठण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मान्यवरांना "जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या मेळाव्यात प्रसंगी महाराष्ट्रातील कलावंतांनी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले असून सहभागी होणाऱ्या कलावंतांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
Satyashodhak, Bahujan