बुलढाणा, २ जानेवारी - महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत 'सत्यशोधक' चित्रपट ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. स्त्री शिक्षणासाठी आपल जीवन वेचणाऱ्या ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले. ते चित्रपटाच्या माध्यमातून उलगडल्या जाणार आहे. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा स्वाती अनिल कन्हेर यांच्या कडून 'सत्यशोधक' हा चित्रपट ५ जानेवारी शुक्रवारी दुपारी १२ ते ३ यावेळेस बुक केलेला आहे. खास माहिलांसाठी हा शो असणार आहे. त्यावेळेस केलेले कार्य आजच्या महिलान पुढे आले पाहिजे या उदात्त हेतूने बुलढाणा शहरात वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्थे तर्फे माहिलांसाठी हा चित्रपट मोफत दाखवल्या जाणार आहे.
या चित्रपटाचे निर्माते बुलढाणा जिल्ह्यातील सुनिल शेळके. माजी उपजिल्हाधिकरी आहेत ही अभिमानाची बाब आहे. सुनिल शेळके यांना खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस जयश्रीताई शेळके यांचे चित्रपटात वैचारिक योगदान आहे. तिकीटासाठी वसुंधरा नागरी पतसंस्था सक्युर्लर रोड कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ बुलढाणा येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरी या संधीचा फायदा महिलांनी घ्यावा असे आवाहन वसुंधरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. स्वाती कन्हेरे पाटील यांनी केले आहे.