सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात; अधिकाऱ्यांकडून पाहणी
नायगाव : क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची १९३ वी जयंती ३ जानेवारीला उत्साहात साजरी होणार आहे. यंदाच्या जयंती सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. अतुल सावे, ना. छगन भुजबळ यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्रीच येणार असल्याने देवील सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कोणतीही कमतरता राहू नये यासाठी प्रशासनाने सतर्कता बाळगावी. नायगावचा समारंभ देदीप्यमान व्हावा, खातेप्रमुखांनी सज्ज रहावे, अशा यासाठी सूचना तहसीलदार अजित पाटील यांनी केल्या आहेत.
नायगाव येथे होणाऱ्या जयंती मुख्यमंत्र्यांसह सोहळ्याला पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, आ. रामराजे ना. निंबाळकर, राज्य महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर, महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे जयंतीदिनी होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा अधिकाऱ्यांनी घेतला. शनिवारी तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, नायब तहसीलदार वैभव चंदनशिव, प्रकाश बोंबले, सरपंच साधना नेवसे, उपसरपंच रेश्मा कानडे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, शिवसेना तालुका प्रमुख आदेश जमदाडे यांनी तयारीची पाहणी केली.
नायगाव येथील सावित्रीबाई फुले स्मारक सजावट, कार्यक्रमस्थळी सभा मंडप उभारणी, स्टेज रंगरंगोटी, फिरते शौचालय, आरोग्याविषयक सुविधा, पार्किंग व्यवस्था करण्याच्या अधिकाऱ्यांनी केल्या. महाराष्ट्र शासनाच्या महाज्योतीमार्फत विविध स्टॉल उभारण्यात येणार आहे. तसेच केसुर्डी मार्गे नायगाव व पंढरपूर फाटा ते नायगाव या रस्त्यांची पार्किंग व्यवस्था व डागडुजी करण्यात आली आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission