रामटेक, ता. २७ः राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मंगळवारी (ता. २६) रामटेक तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन झाले. विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांकडे सोपविण्यात आले.
७ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत ओबीसींचे हक्क आणि विविध मागण्यांच्या संदर्भात गांधी चौकात धरणे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी ओबीसींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन धरणे आंदोलनाचे संयोजक (उपाध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ, महाराष्ट्र प्रदेश) कांचनमाला माकडे, रमेश कारेमोरे, नागपूर जिल्हा समन्वयक डॉ. राजेश ठाकरे, रामटेक तालुका अध्यक्ष नानाभाऊ ऊराडे, भाऊराव रहाटे, सुधाकर मोहोळ यांनी केले आहे. निवेदन देताना ज्योती कोल्हेपरा, लता कांबळे, अर्चना डांगरे, माधुरी सावरकर, अक्षय हटवार, परशुराम रकसिंगे, चंद्रशेखर मेंघरे, पारस माकडे, माजी जि.प. सदस्य कैलास राऊत, राहुल किरपान, राजकुमार राहते, आदी ओबीसी बांधव उपस्थित होते.