महाबळेश्वर : महाबळेश्वर आगारास नवीन वाहने लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावीत, विद्यार्थ्यांसह नागरिकांना आगारातील सध्याच्या खिळखिळ्या एस. टी. बसमधून धक्के खात प्रवास करावा लागत अडचणींचा सामना करावा लागत असल्याने बसची दुरुस्ती करावी, वाहक व चालकांची पुरेसी संख्या ठेवावी, या मागण्यांसाठी ओबीसी संघटेनच्यावतीने मंगळवारी बसस्थानकात आंदोलन केले.
आंदोलनात संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल लोहार, अॅड. संजय जंगम, सतिश लोखंडे, कुमार शिर्के, संतोष सुतार, सुनील यादव, संजय सुतार, बाबा बडाणे, अनिल ढेबे, निसार डोंगरे, संतोष यादव, भीमराव केळगणे यांच्यासह पदाधिकारी व प्रवासी उपस्थित होते.
आंदोलनावेळ आगार व्यवस्थापक वैभव कांबळे यांनी आंदोलनाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. यावेळी वरिष्ठांनी पदाधिकाऱ्यांना बसेसची दुरुस्ती करून घेतली जाईल, तसेच नवीन बसेस मिळवण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे सांगितल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले
Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan