माजलगाव, दि. १४ :- शासकीय कामकाजाचा शासनाने पाच दिवसांचा आठवडा करतांना शासकीय कार्यालयाच्या वेळेत बदल करत शासकीय कार्यालयांच्या कामकाजाची वेळ सकाळी • ०९:४५ ते सायंकाळी ०६ : १५ अशी केलेली असून शनिवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी बहाल केलेली आहे. परंतु शासकीय कर्मचारी सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन कामकाजाच्या वेळा पाळत नाहीत याबाबत माजलगाव तहसील कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांना कुठलेही वेळेचे बंधन राहिलेले नसून याबाबत तहसीलदार यांच्याकडे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने प्रत्यक्ष भेटून तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व नागरिक यांच्या विविध प्रश्नासंबंधी तहसील कार्यालयात जाऊन त्यांना अनेक चकरा मारूनही वेळेवर कर्मचारी भेटत नाहीत. त्यामुळे सामान्य माणसांची शेकडो कामे खोळंबून पडत असून शेतकऱ्यांना, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसीलदार माजलगाव यांना निवेदन देऊन शासनाने सहा दिवसाचा कार्यालयीन कामकाजाचा आठवडा करावा तसेच कार्यालयीन वेळेत न येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ड. नारायण गोले पाटील यांच्यासह भाई मुंजा पांचाळ, भाई विष्णू शेळके, शेख फारुख सतीशराव रिंगणे, सतीश वगरे, सय्यद मुक्तार सय्यद हुसेन, बाळू वंजारे, राजेभाऊ शेरकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला आहे.