अमळनेर, दि. २८ - अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, स्वागताध्यक्षपदी श्याम पाटील (संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक) यांची, तर कार्याध्यक्षपदी मुकुंद सपकाळे (प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा) यांची निवड करण्यात आल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी व राज्य उपाध्यक्ष अर्जुन बागुल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक धनादाई कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. लीलाधर पाटील, संयोजक सुप्रसिद्ध साहित्यिक मिलिंद बागुल, तर मुख्य समन्वयक युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, करीम सालार आहेत. निमंत्रक म्हणून अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे आदी उपस्थित राहणार असून, हे विद्रोही मराठी साहित्य संमेलन धुळे रोड आर. के. नगरसमोरील कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरीत होणार आहे. देशातील सध्याच्या हुकूमशाही व भांडवलशाहीच्या काळात साहित्यिक, माध्यमांची होणारी | मुस्कटदाबी या पार्श्वभूमीवर हे संमेलन महाराष्ट्रातील एक महत्त्वाची सांस्कृतिक साहित्यिक घडामोड ठरणार आहे. याप्रसंगी अमळनेर विद्रोही स्थानिक समिती अध्यक्ष गौतम मोरे, लेखक-कवी डॉ. सत्यजित साळवे, कोषाध्यक्ष | बापूराव ठाकरे, जळगाव ग.स. बँकेचे संचालक राम पवार, सुरेश पाटील, सुरेंद्र पवार, दयाराम पाटील सर, लेखक बळवंत भालेराव, वसंत सपकाळे, प्रा. यशवंतराव मोरे, तुषार सावंत, संभाजी पाटील, संदीप पाटील, प्रफुल पाटील, फहीम अहमद पटेल, भाऊराव इंगळे, रमेश सोनवणे, बापूराव ठाकरे, मा. उमाकांत ठाकूर, प्रा. प्रीतीलाल पवार, विशाल सोनवणे, अजिंक्य चिखलोदकर आदी उपस्थित होते.