बुधवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे 198 जयंती महात्मा फुले नगर येथे काळेश्वरी मंदिर परिसरात अभिवादन करून करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत शहाबाद जिल्हा परिषद शाळेतील पाच विद्यार्थिनींच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले आणि दीपक प्रज्वलित करण्यात आले.
यावेळी महात्मा फुले नगर व शहाबाग मधील सर्व मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. यामध्ये किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक शिवाजी जमदाडे ,माजी नगरसेवक महेंद्र जमदाडे , महात्मा फुले स्मारक समितीचे अध्यक्ष रंगराव जमदाडे, तेजस जमदाडे ,सुनील ससाने, माजी नगरसेवक संदीप जावळे, दादा अडसूळ , कुदळे अण्णा आणि इतर मान्यवर आणि महिला वर्ग उपस्थित होते.