आज क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्टुडंट्स राईट्स फाउंडेशनच्या माध्यमातून एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
''चला शाळेत जाऊया ''
सरकारी प्राथमिक शाळेत ग्रामीण व शहरी भागातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. मागील काही वर्षांपासून सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थी गळतीचे प्रमाण खूप वाढले आहे. पालक आपल्या मुलांना खाजगी शाळेत शिकवत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शाळा मोडकळीस येत आहेत. शासनाने सुद्धा समूह शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो समूह शाळेचे फार वाईट परिणाम ग्रामीण शिक्षणावर होणार आहेत. गावात शाळा नसेल तर गरीब पालक आपल्या पाल्यांना शिकवू शकणार नाहीत. खाजगी शाळेचे शुल्क त्यांना परवडणारे नाही.
सरकारी जिल्हा परिषद शाळा आणि शहरातील महानगरपालिकेच्या शाळा वाचल्या पाहिजेत. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे हक्काचे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी चला शाळेत जाऊया या उपक्रमाअंतर्गत ,शाळा वाचवा शिक्षण वाचवा ही मोहीम राबविण्याचे स्टुडंट्स राईट्स फाउंडेशनने ठरविले आहे. यासाठी येत्या वर्षभरात 3 जानेवारी ,2024 पासून ते 3 जानेवारी 2025 पर्यंत काही ठराविक जिल्ह्यातील शाळा घेण्यात येतील. या मोहिमेत माजी विद्यार्थी, पालक, तज्ञ शिक्षक, शाळेतील शिक्षक व शिक्षण समिती यांना एकत्रित करून शाळेची गुणवत्ता कशी वाढवता येईल यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. वर्षभरात सर्व माहिती संकलित करून , विश्लेषणात्मक अहवाल शासनास सादर करण्यात येईल.
कार्यक्रमात , पियूष आकरे, कृतल आकरे,प्रतीक बावनकर, देवेंद्र समर्थ, विशाल पटले, आकाश वैद्य,मनीष गिरडकर, नयन काळबांधे, रणजित सोनवणे, धीरज भिसीकर,संजय भुरे अनुप खडक्कर,यजुर्वेद सेलोकर,आदित्य बोचे, पंकज सावरबांधे हे उपस्थित होते.
चला शाळेत जाऊया
उमेश कोर्राम - अध्यक्ष, स्टुडंट्स राईट्स फाउंडेशन.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan